पान:वेरुळ.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


स्वच्छता राखण्याकरितां आणि दुरुस्ती करण्याकरितां लक्षावधि रुपयांची स्वतंत्र व्यवस्था केली आणि आसेतुहिमाचल, अशा प्रकारच्या जागा चांगल्या परिस्थितीत राहतील असा अंमल सुरू केला.

 कांही प्रेक्षणीय स्थलें हिंदुस्थानांत इतस्ततः पसरलेल्या संस्थानांमध्येही आहेत. किंबहुना अत्यंत प्रेक्षणीय अशा जागा बहुत करून संस्थानांमध्येच आहेत झटले तरी चालेल. उदाहरणार्थ, साची, बारहत येथील प्रसिद्ध अशोक कालीन स्तूप भोपाळच्या राज्यांत आहेत; बाघ येथील लेणीं ग्वाल्हेर संस्थानांत आहेत; वेरूळ, अजंठा येथील लेणी निजामचे राज्यांत आहेत; गिरनार पहाडावरील जैन देवळे पालिठाणा संस्थानांत आहेत.

 पण लॉर्ड कर्झन साहेबांनी सर्व संस्थानांना लिहून प्राचीन देवळें, कोरीव लेणी, गुद्दा वगैरे कोठें कोठें काय काय जागा आहेत, यांची माहिती आणवून त्या त्या जागा त्या संस्थानांतून नीट राहतील अशी व्यवस्था करविली. त्यामुळे आज अनेक संस्थानां- मध्ये असणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांची बरीच सुव्यवस्था आहे. निदान केव्हांतरी वर्षाकाठी दहापांच वेळां झाडलोट, “प्रेक्षणीय स्थळ आहे; या जागेवर कोणी घाण अगर नासधूस करूं नये.” वगैरे वगैरे अशा अर्थाची एखादी पाटी, एवढी तरी व्यवस्था आज बहुतेक जी स्थळे प्रेक्षणीय ह्मणून ठरली आहेत अशा ठिकाणी आहे.

 फार लांब कशाला ? औंध संस्थानांत कुंडलेशेजारी वीराण्णाची टेंकडी आहे, त्या ठिकाणी पांच सहा गुहा कोरलेल्या आहेत. एका गुहेमध्यें वीरभद्राची मूर्ति स्थापिलेली आहे. पाण्याची एकदोन टांकीही आहेत. त्या जागेच्या झाडलोटीची व्यवस्था औंध संस्थानाला करावी लागते. त्या ठिकाणी नासधूस करणाराला " कायद्याप्रमाणें शिक्षा होईल " अशी पाटीही लाविली आहे.

 प्राचीन प्रेक्षणीय स्थळांवर हा सर्व उपकार लॉर्ड कर्झन साहेबांनी केला यांत कांहीं शंका नाही.

 संस्थानांत असणाऱ्या साची, बारहत, वेरूळ, अजंठा, वगैरे स्थळांना तर यूरोपीय प्रेक्षकांची आणि व्हाइसरॉय, गव्हरनरापासून ते तहत साधारण एंजिनीयर पर्यंतच्या सरकारी ऑफिसरांची नेहमी रहदारी लागलेली असते. या कारणामुळे अशा