पान:वेरुळ.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री आईआदिपुरुष.

( १ ) वेरूळची लेणी.


 आह्मी १९०८ साली नागपूर येथील प्रदर्शन पहावयास गेलो होतो. परत येतांना अकोला, उमरावती, जळगांव या मार्गाने आलो. तेव्हां जळगांवाहून अजंठा येथील लेणी पहावयास गेलो होतों. जळगांवांत टांगे ठरविले. दुपारी निघालों, ते रात्री फरदा- पुरांत धर्मशाळेत मुक्काम करून सकाळी अजंठ्याचे लेण्यांजवळ जाऊन मुक्काम केला. त्या ठिकाणी लेणी पाहून, दुपारी जेवण केलें, पुन्हां लेणी पाहिली व निघून जळगांवास परत आलों.

 याप्रमाणें अत्यंत घाईनें लेणी पाहिली. शिवाय बरोबर फोटोग्राफ घेण्याचे वगैरे कांहीं सामान घेतले नसल्या कारणानें कांहीं फोटोग्राफ्ससही घेतले नाहीत.

 अठरा वर्षांपूर्वी हल्लीपेक्षा लेण्यांची फार अव्यवस्था होती. तेथें रक्षणार्थ एक शिपाई असे. कांहीं लेण्यांना पाकोळ्या आंत जाऊन भिंतीवरील चित्रांस त्यांच्या मूत्र- पुरीषोत्सर्गापासून उपद्रव होऊं नये ह्मणून जाळ्यांची दारे लाविली होती. परंतु अनेक लेण्यांत त्या वेळींही ( १९०८ साली ) पुष्कळ पाकोळ्या होत्या. आणि मधमाशांची पोवळी तर फारच लागलेली असत. झाडणे, लेणी स्वच्छ ठेवणे, कोणी येईल त्यास भिंतीस स्पर्श वगैरे करूं न देणें, इत्यादि गोष्टींविषयीं जवळ जवळ अव्यवस्था होती झटले तरी चालेल.

हिंदुस्थानांतील प्राचीन इमारतींवर आणि प्रेक्षणीय स्थलांवर हा उपकार ह्मणजे खरोखरी, हिंदुस्थानचे व्हाइसरॉय असतांना लॉर्ड कर्झन साहेबांनी केलेला आहे. त्यांनीच हिंदुस्थान सरकारच्या बजेटांत प्राचीन इमारती आणि दर्शनीय स्थळे यांची सुव्यवस्था,