पान:वेरुळ.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२

भाव दाखवावा व पायांवरून त्या त्या भावाची तीव्रता दाखवावी असा हिंदी शिल्प- शास्त्रकारांचा दंडक आहे. पहाणारानें हिंदी चित्रांकडे हें मुख्य मर्म लक्ष्यांत ठेवून पहावें लागतें व हें काम श्रीमंतांनी उत्तम प्रकारें केलें आहे. तात्पर्य :-- अजंठा व वेरूळ येथील लेण्यांची सूक्ष्म पहाणी करून त्यांतील निव- डक सुंदर भाग सामान्य वाचकांस उपलब्ध करून देऊन या कलेकडे जनतेचें लक्ष्य वेधल्याबद्दल श्रीमंतांचे अभिनंदन करावें तितकें थोडेंच होणार आहे. त्यांचे हातून जनतेची अशीच सेवा अनेक वर्षे घडत रहावी अशी परमेश्वराची प्रार्थना करून

चित्रेण वर्णनं
चित्रेण वर्णनेन । विभाति ग्रंथः ॥

असें म्हणून हा लेख पुरा करतों.

कृष्णाजी विनायक वझे.