पान:वेरुळ.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११


दिसत असल्याने त्यांनी त्या प्रांजलपणे नमूद केल्या आहेत. परंतु सामान्य वाचकांना त्या उणीवा भासतसुद्धां नाहींत व तज्ज्ञांना एकंदर कामाचा अवाढव्यपणा कळत अस ल्यामुळे त्या अपरिहार्य आहेत हे कळते.

 तात्पर्य :- या उणीवा दोषास्पद आहेत असें म्हणतां येत नाहीं.

 लेण्यांचा इतिहास, तीं कोरणारांचें आचार-विचार व चित्रांवरून काढावयाची अनुमानें यांचाही थोडक्यांत व स्पष्ट असा परामर्ष घेतला आहे. चित्रांतील भाव दाख- विण्यांचें काम तर श्रीमंतांनी फारच उत्तम केलें आहे. खऱ्या निष्णात व रसिक माणसांशिवाय दुसन्याला हे साधणे अशक्य. हिंदु चालीरितींच्या माहितगार माणसांची येथें फार अवश्यकता असते. नवपरिणित व अपरिचित वधूवरांच्या मनांतील भाव पाश्चात्यांना कळणेच शक्य नाहीं. त्यांची तरुण माणसें अपरिचित असतात तेव्हां वधू- वर नसतात, व वधूवर होतात तेव्हां अपरिचित नसतात; यामुळे त्यांच्या मनाला या विकाराची जाणीवच नाही व त्यामुळे त्यांना आमची चित्रे (Stiff) निरस वाटतात. खरें वैराग्य, निस्सीम अव्यभिचार ( मानसिक व्यभिचाराचासुद्धां अभाव), सद्गुरुनिष्ठा व धार्मिक अलोट श्रद्धा या गोष्टीही पाश्चात्यांना कमी कळतात. ही उणीव पाश्चात्य ग्रंथ विशेषतां हिंदुस्थान व हिंदु लोक यांसंबंधी लिहिलेले ग्रंथ वाचूं लागलं म्हणजे स्पष्ट दिसते. ही उणीव या पुस्तकानें उत्तम प्रकारें भरून काढली आहे.

 चित्रांतील शारीरासंबंधाचा श्रीमंतांचा मुद्दा फारच विचार करण्यासारखा आहे. ज्या कारागिरांना झाडाच्या पानांवरील रेषा दाखवितां आल्या त्यांना दंड, मांड्या वगैरेंचे स्नायूंचे गोळे दाखवितां आले नसते असं म्हणवत नाही. परंतु हिंदी लोकांची शरीराची व मनाची ठेवणच निराळी म्हणून हा असा भेद पडतो. हिंदु लोकांचें असण्या कडे जितकें लक्ष्य आहे तितकें दिसण्याकडे नाहीं. हिंदु मनुष्य असें समजतो की, "आपण श्रीमंत, विद्वान्, बलवान् व धार्मिक असावें; मग हें असणे लोकांना दिसलें नाहीं तरी चालेल; किंबहुना तें दिसूं नयेच.” पाश्चात्यांत असेल नसेल तें सर्व दिसले पाहिजे अशी भावना असल्यामुळे अनेक बाबतीत पाश्चात्य व हिंदु यांत जमीनअस्मान अंतर पडतें.

रूपेण गुणमेवैकः । हस्तें: कार्य तथैवच
चक्षुता च भवेद्भावः । पादेनावेगदर्शनम्

चित्राच्या शरीराच्या ठेवणीवरून ते कोणत्या गुणाचें निदर्शक आहे तो गूण दाखवावा. हातांवरून ते कोणत्या व्यवसायात्मक आहे हे दाखवावें, डोळ्यांवरून त्याच्या मनांतला