पान:वेरुळ.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०


व बारहत वगैरे प्राचीन अवशेषांपेक्षां वेरूळ, अजंठा येथील लेणीं भिन्न परिस्थितीतील आहेत. त्या वित्रांचे पेहराव वगैरे निराळे आहेत ही गोष्ट खरी; म्हणून तीं चित्रे भिन्न संस्कृतीची निदर्शक आहेत असे म्हणणें धाडसाचें होईल. आजच हिंदुस्थानांत काय परिस्थिती आहे पहा. आज हिंदुस्थानांत उघड्या डोक्यांनी हिंडणारे लोक म्हणजे बंगाली व मद्रासी होत. यांचें नेसणें व उत्तरीयही सारखेंच असतें. बंगाली लोक संबंध केंस वाढवितात व मद्रासी तसें करीत नाहींत इतकाच भेद. म्हणून त्यांची संस्कृति एक आहे असे म्हणतां येणार नाहीं. कासोटा न घालणारे पुरुष म्हणजे मद्रासी व पंजाबी जाट होत. कांसोटा न घालणाऱ्या स्त्रिया म्हणजे मद्रासी व गुज- राथी होत. लेहंगे पेहरणाऱ्या स्त्रिया म्हणजे मारवाडी व सिंधी होत. हातभर बांगड्या घालणान्या स्त्रिया म्हणजे मारवाडी व भिल्लीणी होत. पोषाख वगैरेंच्या या साम्या वरून अगर यांच्या शेजाऱ्यांशी असलेल्या यांच्या भेदावरून आपणांस यांच्या पूर्व- संस्कृतीचा कांहीं अंदाज करणे योग्य होईल काय ? जर आज असा अंदाज करणे योग्य नसेल तर मागच्या काळाबद्दलसुद्धां आपण हीच खबदारी घेणे उचित होय. या साम्यभेदावरून हे लोक समान अगर भिन्न हवा, पाणी व परिस्थिति वगैरेंत वाढलेले होते इतकें आपणांस म्हणतां येईल. परंतु ते आर्य कां अनार्य, द्राविड कां गौड दाक्षिणात्य का औदिच्य असा निश्चय या पोषाख वगैरेंवरून करता येणार नाहीं. ज्या- बद्दल जास्त संशोधन व चर्चा झाली पाहिजे असा हा विषय आहे खरा. इतकें म्हणावयास हरकत नाहीं.

 श्रीमंत पंतांनी या आपल्या पुस्तकांत या लेण्यांचा या सर्व दृष्टींनीं सांगोपांग विचार केला आहे. अगोरच यांना चित्रकलेचा नाद असून त्या दृष्टीने यांनी लेण्यांची सूक्ष्म पहाणी व खोल विचार केलेला जागोजाग आपल्या निदर्शनास येतो. लेण्यांची मजबुती प्रदर्शित करण्यासाठी यांनी लांबी, रुंदी, उंची व जाडी वगैरेंचे निर्देश केले आहेत. उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी कोणत्या लेण्यांत कोणती कर्मे करीत हें चैत्य, विहार वगैरें नांवें देऊन सांगितले आहे. कलाकुसरीसाठी तर भरपूर चित्रे व तपशील- वार वर्णनें दिली आहेत. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी आपल्यासंबंधानें आपणच स्वतः

मज कळों येती । म झे अवगूणl
काय करूं मन । अनावर ll

असे म्हटलें आहे, तसेंच श्रीमंतांना आपल्या स्वतःच्या उणीवा इतरांपेक्षां जास्त स्पष्ट