पान:वेरुळ.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


गेलेल्या नउशे वर्षांचा परिणाम लेण्यांच्या दगडवगैरेंत दिसून येतो. परंतु असा मोठा जर्णिपणा भिन्न भिन्न लेण्यांत दिसत नाही. वरील म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे कीं, या लेण्यांचा जन्मदिवस कालज्ञांना नक्की सांगता येत नाहीं. परंतु तो अगदी प्राचीन घेतला तर ख्रिस्तपूर्व दोनशे असेल; अगदी अलिकडचा मानला तर ख्रिस्तोत्तर सातशे असेल. म्हणजे या नऊशे वर्षांच्या दरम्यानच्या काळांत तो कर्धीतरी झाला असावा. यापेक्षां नजीकचा जास्त बरोबर अंदाज करण्यासाठी पुरावा उपलब्ध नाहीं. आज लेण्यांना देण्यांत आलेल्या अनुक्रमांकावरून त्यांचा अनुक्रम नक्की करणे अयोग्य होईल, तसेंच वरील मित्तीवरून त्यांची जन्मतिथि ठरविणेही अयोग्य ठरेल.

 हल्ली पहाडपूर येथे गंगेच्या काठीं सांपडलेल्या एका देवळाचे जैन,बौद्ध व हिंदु यांत अनेक वेळां रूपांतर झाल्याचे आढळून आले आहे. मूळ गर्भागार कायम ठेवून निरनिराळ्या काळी निरनिराळ्या पंथीय लोकांच्या सोयींप्रमाणे त्या देवळांत फेरफार केलेले आहेत. एक लहानसे जैन मंदिर हल्ली फार मोठे झाले असून त्या- वर बसलेल्या वाळूच्या झांकणामुळे ते पहाड (डोंगर) झाले व त्यावरून त्याला 'पहाडपूरचें मंदिर' या नांवानें बंगालच्या संशोधन खात्यानें नांव ठेवलें आहे. सिंधा- तील 'माहिंजोदडो' ही एक माही लोकांची टेंकडीच म्हणण्यांत येते. सिंधी भाषेत ‘दडो' म्हणजे ढीग अगर डोंगर व ' माहिंजो' म्हणजे 'माहींचा' असा अर्थ आहे. जैन लेण्यांना कित्येक ठिकाणी कधीं कधीं 'चांभार लेणीं' या नांवानें संबोधण्यांत येतें. म्हणून त्यांत चांभारांचा कांहीं संबंध आहे असे कोणी मानीत नाहीं. तसेंच या लेण्यांचें समजावें.

तात्पर्य :- हीं लेणीं अमुक पंथीयांच्या उपयोगासाठी बांधली आहेत अगर यांतील चित्रे अमुक आगमांतील आहेत यासाठी यांना अमक्यांची लेणी म्हणावयाचीं. बाकी त्यांना पैसे पुरविणारा धनिक त्या पंथाचा होता किंवा तेथें कामें करणारे लोक त्या पंथाचे अनुयायी होते अशी समजूत करून घेण्याचें कांहीं कारण नाहीं.

[८]. सामाजिक परिस्थिति


 जी गोष्ट धर्मपंथाची तीच स्थिति सामाजिक परिस्थितीची होय. त्या चित्रांत अमुक प्रकारचे पोपाख व अलंकार दाखविले आहेत, यावरून ते कारागीर अमुक देशाचे रहिवासी होते किंवा अमुक चालिरीति पाळीत असें नक्की सांगतां येणार नाहीं. सांची