पान:वेरुळ.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


[७].आचार-विचार.


 अमकी लेणीं अमुक धर्मीयांनी कोरलीं व तमकीं लेणीं तमुक धर्मीयांनी कोरलीं; अमकीं अगोदर कोरलीं, अमकीं मागून कोरली, अशी भाषा या लेण्यांसंबंधानें आपण वापरतों खरों, परंतु विचाराच्या कसोटीवर हे म्हणणें टिकत नाहीं. बौद्ध पंथी लोकां- साठी, जैन पंथी लोकांसाठी किंवा शैव पंथी लोकांसाठीं अमुक लेणी कोरलीं असें आपण म्हटलें तर ते म्हणणे सयुक्तिक होईल. अमुक लेणें कोरविणारा धनिक बौद्ध धर्मी होता किंवा तमक्या लेण्यावर काम करणारे कारागीर जैन धर्मी होते असे म्हणण्यास आपणांस काय आधार आहे ? एखाद्या राजाने किंवा सज्जनानें निरनिराळ्या आचार- विचारांच्या लोकांसाठीं ह्रीं कोरविलीं नसतील असे नाहीं. कांहीं बौद्ध स्तूपांना हिंदुस्था- नांतील नाना प्रदेशांतील, नाना पंथांच्या लोकांनी वर्गण्या दिल्याचे दाखले शिला लेखां- तून सांपडतात. जैन, बौद्ध, ब्राह्मण वगैरेंचे जरी शाब्दिक मतभेद असले तरी त्यापैकी एकपंथी लोक दुसऱ्यास मदत करीतच नव्हते किंवा दुसन्यांच्या कामांवर काम करण्यास जात नव्हते असें नाहीं. फार कशाला, मुसलमानांच्या कामांवर हिंदु, व हिंदूंच्या कामां- वर मुसलमान कारागीर असल्याचे व धनिकांनीं पैसे दिल्याचे दाखले आहेत. सलाबत- खानाचे नळ व हौद आणि नानाफडणविसाचा घोडेपीर आज हयात आहेत. एकमेकांचा द्वेष करणारांची जर ही स्थिति तर एकाच धर्माच्या पोटभेदांची काय स्थिति असेल ? याचा सुज्ञांनींच विचार करावा. हीं लेणीं कोणा गोरगरीबांनीं कोरविलेलीं नाहींत. हीं सार्वभौम चक्रवर्तीनीच कोरविणे शक्य आहे व त्यानें आपल्या सर्व प्रजाजनांच्या उपयोगासाठी कोरविलेली असावीत असे अनुमान करणे योग्य होय.

 हीं लेणीं सर्व एकाच काळी होणें शक्य नाहीं. इतकेंच नव्हे तर एक एका लेण्याचे काम अनेक वर्षे चाललें असण्याचा संभव आहे. एकांनीं भव्यपणाकडे लक्ष्य दिलें, दुसन्यानें मुखसोयींचाच विचार केला, तिसण्यानें सौंदर्यावरच भर दिला असे या लेण्यांतून झालेले दिसतें. कैलास लेण्यावर शिव व विष्णु पुराणांतील चित्रे कोरली तशीं दुसन्या लेण्यांत बौद्ध किंवा जैन आगमांतील कोरतां आलीं नसती असे नाही. परंतु कोरणारांनी त्या बाबीकडे लक्ष्य दिले नाहीं इतकेंच. या लेण्यांचा काळ ख्रिस्तपूर्व दोनशे वर्षांपासून ख्रिस्तोत्तर सहा सातशे पर्यत धरतात. याचा अर्थ असा नव्हे कीं, अगदी पहिले लेणें ख्रिस्तपूर्व दोनशेव्या वर्षी झालें व अगदी शेवटचें लेणें ख्रिस्तोत्तर सातशेव्या वर्षी झालें. तसेंच असतें तर मध्यंतरी