पान:वेरुळ.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फूट उंचीचे पुतळे लेण्यांत आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या सरळ व वांकड्या रेघांनी केलेल्या नकशांचे प्रकार तर अनंत आहेत. दोन दोनशें फूट लांब, पन्नास, साठ फूट रुंद, व ऐशी, शंभर फूट उंच अशा इमारती अखंड दगडांत कोरलेल्या आहेत. यावरून त्यांच्या भव्यपणाची कांहीं थोडी कल्पना येईल.

[५]. सामान.

 या इमारती ज्या सामानाच्या केल्या आहेत तें सामान लांकडासारखें मऊ व सहज सांधणारें नाहीं; तें लोखंड वगैरे धातूंसारखें लवचीक अगर पातळ करून ठशांत ओतण्यासारखें नाहीं; तें यारी व दोरखंडांनी इकडून तिकडें वाहून नेऊन जोडण्या- सारखें नाहीं; तें छिन्नीनें तोडून टांकीनेंच घडावें लागतें. हैं हजारों वर्षे हवा व पाण्याला दाद देणार नाहीं असें मजबूत आहे; माथ्यावर सबंध डोंगराचा बोजा सहन करील असे सहिष्णु आहे; व टांकीनें घडून वडाच्या किंवा आंब्याच्या पानाच्या शिरानशिरा दाखावतां येतील असें सुघड आहे. अशा या काळ्या दगडावर नुसत्या मातीचा गिलावा केला आहे व या गिलाव्यावर साध्या पाण्याच्या रंगानें चित्रे काढली आहेत, ती आज निदान दोन हजार वर्षे जशींच्या तशींच आहेत ! पाश्चात्यांचें तेलांतल्या रंगांचें चुन्याच्या गिलाव्यावरील अगर कापडावरील चित्र शंभर वर्षांत फिक्कें पडतें ! हेंच तर येथे मोठें कसब !!

[६]. काळ.

 हिंदुस्थानची संस्कृति फार विलक्षण व अतिप्राचीन आहे. पाश्चात्य समाज शास्त्र, माणसांची उत्क्रान्ति रानटीपणापासून होत होत आली आहे असे म्हणतें. परंतु हिंदु- स्थानाला हा नियम लागू नाहींसा दिसतो. वेदाच्या अतिप्राचीन ग्रंथापासून ते माहि- जोदडो येथील अवशेष किंवा कोरीव लेणी यापर्यंत कोठेंही नजर फेंकली तरी हिंदु- लोक रानटी असल्याचा पुरावा सांपडत नाहीं. जिकडे पहावें तिकडे हे लोक सुधार- लेले व प्रगल्भ असेच दिसतात व भिल्ल वगैरे जाती आज इतके दिवस आहेत त्याच स्थितीत आहेत. त्यांची उत्क्रान्ति होत नाहीं व दुसऱ्यांची निकृष्ठ स्थिति सांपडत नाहीं अशी स्थिति हिंदुस्थानच्या इतिहासाची आहे.

या देशांत सामान्यतः कोणत्याही गोष्टीची शक, महिना, मित्ति ही दिलेली सांपडत नाहीं. येथे इतके राजे-चक्रवर्तीराजे, इतके शक व इतक्या प्रकारची