जीवनाच्या संध्याछायेत लिहिली जातात. आत्मकथने जीवनाच्या उभारीत त्यात प्रबोधनापेक्षा अनुभवकथन, कृतज्ञताज्ञापन व कृतकृत्याचा भाव असतो. ‘मागच्यास ठेच, पुढचा शहाणा' असे अनौपचारिक शिक्षण व शिकवण देणाच्या चाकाची खुर्ची'सारख्या आत्मकथनाचे साहित्यापेक्षा सामाजिक मोल मोठे असते. मूल्यमापनाचे परिमाणही सामाजिकच लावणे अधिक तर्कसंगत असतं.
नसीमा हुरजूक काही जन्मजात अपंग नव्हत्या. वयाच्या सोळाव्या वर्षी प्री डिग्रीमध्ये शिकत असताना पाठीचे दुखणे उद्भवण्याचे निमित्त झाले नि त्यांच्य कंबरेखालच्या भागाचे चैतन्य हरवले. उन्मळून पडल्यावर सुद्धा उठायची, उभी राहायची जिद्द त्यांच्यात बालपणीपासूनची, बालपणीच्या वृत्तीच प्रौढकाळी फोफावतात. तसेच झाले. पॅराप्लेजियाची शिकार झाल्या तरी त्यांनी उभारी सोडली नाही. अशात बाबूकाका दिवाण यांच्यासारखी प्रेरक व्यक्ती त्यांना जगण्याचा अर्थ समजावते नि चाकावर खिळलेल्या नसीमा हुरजूकना आकांक्षापुढे गगन ठेंगणे वाटू लागते. सुरुवातीस त्या एक संस्था स्थापन करतात. तपभर एकत्र काम करतात. पुढे स्वतंत्र चूल थाटतात. त्यांचा सामाजिक संसार, हेतूची शुद्धता व प्रयत्नांची पराकाष्ठा या दोहोंच्या बळावर सतत वाढत अपंगांचा कल्पवृक्ष बनतो. हे सारे सहज नाही घडत. पावलोपावली अडचणी, मर्यादांचे डोंगर, प्रत्येक वेळी शिखर सर करण्याची सुरसुरी, समाज व कार्यकर्त्यांच्या बळावर उशिरा परंतु यश मिळत गेले. लढल्याशिवाय हरायचे नाही' हे डॉ. अरुण लिमयेंचे ब्रीद त्यांनी अजाणतेपणी आचरले नि तोच त्यांचा जीवनधर्म बनला. आज शासनाने दिलेल्या विस्तृत जागेवर व लोकाश्रयावर कोल्हापूरच्या उचगाव उपनगरात ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड' संस्था ही अपंगांचे अस्थिव्यंगांचे संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, उपचार, पुनर्वसन असे संस्थात्मक नि संस्थाबाह्य स्वरूपाचे कल्याणकार्य करते. हे सारे चलत् चित्रपटासारखे आपल्या डोळ्यांपुढे उभे राहते ते लेखिकेच्या चित्रात्मक शैलींमुळे.
चाकाची खुर्ची' हे नसीमा हुरजूकनी लिहिलेले आत्मकथन म्हणजे ‘आधी केले मग सांगितले'अशा धर्तीचे असल्याने त्यास एक कृतिशील अधिष्ठान आहे. त्यांची लेखनपद्धती जसे घडले तसे लिहिले' स्वरूपाची असल्याने या आत्मकथनात सहजतेतले सौंदर्य आहे. त्या कोणतीही भूमिका (पोज) घेऊन लिहीत नसल्याने वाचकांना थेट भिडते. यांच्यात आपणास साहाय्य करण्याविषयी कृतज्ञतेचा भाव आहे. छोट्या छोट्या सहाय्यकांच्या नोंदीतून त्याचे मोठे मन प्रकटते. या आत्मकथनात सर्वांना शिकण्यासारखे भरपूर आहे. सर्व सुख असताना लोळत आयुष्य घालविणा-याना ही चाकाची खुर्ची' चालायची