Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रेरणा देईल. सत्तेच्या खुर्चीत मशगूल असलेल्या शासनास ही ‘चाकाची खुर्ची' कमिशनकडून 'मिशन'कडे जाण्याचा मार्ग दाखवील. खुद्द अपंग बंधू, बांधवांना ही ‘चाकाची खुर्ची' कायदा पाळा गतीचा, थांबला तो संपला ही शिकवण देईल.

 उत्कृष्ट आत्मकथनाची एक कसोटी असते. ती वाचकानुगणिक अलगअलग प्रेरणा देते. चाकाची खुर्ची आत्मकथन याच पठडीतले. मुळात हे आत्मकथन दैनिक सकाळ, कोल्हापूर आवृत्ती १९९९ च्या सुमारास धारावाहिक प्रकाशित झाले होते. चाकाची खुर्ची' हे त्याचे ग्रंथ रूप. मुखपृष्ठापासून भरारी घेणारे हे आत्मकथन मलपृष्ठावर पोहचत आपणास संवेदनशील, अंतर्मुख नि कार्यप्रवण करते. मेहता पब्लिशिंग हाउसने त्याची निर्मितीही दर्जेदार केली आहे. आत्मकथनाचे प्रेरक संपादक श्री. अनंत दीक्षित यांच्या या अपूर्व लढ्यामागील प्रेरणा विशद करणारे प्रास्ताविक जीवनावरील श्रद्धा वाढवणारे ठरतं. चाकांची खुर्ची' स्वप्नांची गोफण फिरवत सारे आकाश कवेत घेऊ पाहते... स्थितीशील मनुष्य, पाखरांना सतत भरारी घेण्यास भाग पाडणाच्या या आत्मकथनाच्या प्रत्येक शब्दात हिंदीतील प्रख्यात कवी दुष्यन्त कुमारांच्या या ओळीचे बळे एकवटलय...
 ‘दुख नहीं कोई कि अब उपलाब्धियों के नाम पर,
 और कुछ हो या न हो, आकाश-सी छाती तो है।'


• चाकाची खुर्ची (आत्मकथन)

 लेखिका : नसीमा हुरजूक
 प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे

 पृष्ठे - २२0,  किंमत - १८0 रु.

♦♦

वेचलेली फुले/८३