पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या चिकित्सेत स्त्री भावुकता असते. त्यांच्या चिकित्सेत स्त्री न्यायाची धडपड दिसून येते. आपल्या लेखनातून त्या स्त्रीची बलस्थाने जशी रेखांकित करतात, तशाच त्या स्त्रीच्या कमजोर पक्षावर-घर, अपत्यसुख यावर बोट ठेवायलाही विसरत नाहीत. त्यामुळे ही चिकित्सा अधिक मर्मग्राही ठरते.


• तिस-या बिंदुच्या शोधात

 लेखक - डॉ. तारा भवाळकर
 प्रकाशन वर्ष - २00१

 पृष्ठे - १७३  किंमत - १२0 रु.

♦♦

वेचलेली फुले/८०