पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समदृष्टी आपणास अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्य, असंग्रह, शरीरश्रम, आस्वाद, भयवर्जन, सर्वधर्मी, समानत्व, स्वदेशी, स्पर्शभावना यांसारखी ‘एकादश व्रते' समतेचीच चळवळ होती हे प्रा. पाटगावकरांच्या या निबंधपर व्याख्यानातून कळायला मदत होते.

 ‘क्रांतिकारी संत साने गुरुजींचे जीवन म्हणजे अंतरीच्या तळमळीचा संवेदनशील संवाद. लेखकाने वाचकांना घातलेली सादही याच पठडीतील. साने गुरुजींनी विठ्ठल मंदिर मुक्तीसाठी केलेल्या सत्याग्रहाचा लेखक एक भागीदार नि साक्षीदार. त्यामुळे साहचर्य, संपर्कातून येणारी सजीवता या लेखात आपसूक अनुभवायला मिळते.
  हा सारा लेखसंग्रह म्हणजे प्रा. पाटगावकरांसारख्या धडपडणाच्या शिक्षकांची संस्कार तळमळ. हे एक खदखदणारे समता अभियान होय. प्रा. ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, प्राचार्य राम शेवाळकर प्रभृती वर्तमान संस्कारदीपांच्या प्रस्तावनापुरस्काराने या पुस्तकास एक वेगळीच धार आली आहे. ज्या कुणा पालक, शिक्षकांना आपली मुले विद्यार्थी पुरोगामी व्हावेत असे वाटत असेल त्यांनी हा ग्रंथ त्यांच्या हाती द्यायलाच हवा.


• 'समतेच्या दिंडीचे धारकरी' (भाषणसंग्रह)

 लेखक - प्रा. चंद्रकांत पाटगावकर
 प्रकाशन - कल्पक प्रकाशन, कोल्हापूर

 किंमत ६0/- रुपये

♦♦

वेचलेली फुले/७0