या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मुख्यमंत्री असतानाही दादा किती साधेपणाने राहात, वागत याचा अनुभव मी घेतला असल्यानं चरित्रकारांनी म्हटल्याप्रमाणे ‘जिथे दादा तिथे माणसांचे मोहोळ' हे ठरलेले असायचे. हे चरित्र त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा साद्यंत इतिहास आहे खरा; पण तो केवळ सनावळ्यांच्या जंत्रीने न भरता राजा माने यांनी अनेक दुर्मीळ संदर्भ, प्रसंग देऊन चरित्रनायक वसंतदादा पाटील यांचे व्यक्तिमत्त्व उभे केले आहे.
• महाराष्ट्राचे शिल्पकार : वसंतदादा (चरित्र)
लेखक - राजा माने
प्रकाशक - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, पुणे
प्रकाशन वर्ष - २०११
♦♦
वेचलेली फुले/१७९