Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रा. शिवशंकर उपासे यांनी त्यांचे हे चरित्र लिहून कृतज्ञताच व्यक्त केली आहे. थोर इतिहासतज्ज्ञ शिक्षण विभागाचे संचालक व शिवाजी विद्यापीठाचे संस्थापक, कुलगुरु म्हणून डॉ. आप्पासाहेब पवार यांनी केलेले शैक्षणिक कार्य बहुजनांच्या शिक्षणास उच्च शिक्षणाचे परिमाण जोडणे होय. डॉ. अरुण भोसले यांच्यासारख्या संशोधकांनी त्यांचे रेखाटलेले चरित्र वाचनीय झाले आहे. डॉ. पवार कुशल प्रशासक, कठोर शिस्तीचे संशोधक, विद्यार्थ्यांबद्दल संवेदनशील असलेला हा चरित्र नायक शिक्षण आणि संशोधनातील दीपस्तंभ म्हणून या चरित्रातून पुढे येतो. मराठी भाषा आणि साहित्याला भारतीय ज्ञानपीठाचे पहिले पारितोषिक मिळवून देऊन कोल्हापूरचे नाव वाङ्मय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर नोंदवण्याचे कार्य करणाच्या पद्मभूषण वि. स. खांडेकरांचे चरित्र प्रस्तुत लेखाचे लेखकाने लिहिले आहे. वि. स. खांडेकरांचे साहित्य म्हणजे जीवनासाठी कलेचे समर्थन. साहित्यातील कोणताच प्रकार त्यांनी सोडला नव्हता. हे चरित्र नायकाचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू वाचताना लक्षात येते. वि. स. खांडेकर, भाई माधवराव बागल यांचे समकालीन समाजसुधारक ‘दलितमित्र' दादासाहेब शिर्के यांनी आपल्या ‘गरुड' साप्ताहिकाद्वारे १९२६ ते ७६ अशी पाच दशके जी हक्काची लढाई केली त्याला इतिहासात तोड नाही. दलितांसाठी क्रेडिट सोसायटी स्थापून त्यांना आर्थिक उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी शिर्के यांनी दलितांना केलेले साहाय्य, मिस क्लार्क बोर्डिंगच्या माध्यमातून दलित विद्यार्थ्यांना शिक्षण, त्यांचे समाजप्रबोधन प्रा. डॉ. चंद्रकांत कुरणे यांनी विशद केले आहे.

 लाल निशाण पक्षामार्फत साखर कामगारासारख्या त्यावेळच्या असंघटितांना संघटित करून त्यांना जगण्याचा हक्क मिळवून देणारे कामगार नेते कॉ. संतराम पाटील, त्यांचे झुंजार व्यक्तिमत्त्व प्राचार्य डॉ. विलास पवार यांनी आत्मीयतेने उभारले आहे. कॉ. संतराम पाटील विद्यार्थी संघटनेतून पुढे आले. प्रज्ञा परिषदेच्या कार्यातून त्यांच्यातील कार्यकत्र्यांची घडण झाली. नवजीवन संघटनेतून त्यांचे नेतृत्व समाजमान्य झाले. शेतकरी कामगार पक्ष, कामगार किसान पक्ष आणि लाल निशाण पक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास चिकित्सकपणे या चरित्रात अंकित करण्यात आला आहे.

 श्रमिक प्रतिष्ठानने तडीस नेलेल्या या चरित्र ग्रंथमालेतील आपल्यात असलेले एकमेव नायक म्हणजे प्रा. डॉ. एन. डी. पाटील, त्यांचा सहवास लाभलेल्या प्राचार्य विश्वास सायनेकरांनी त्यांचे चरित्र रेखाटले आहे. प्रा. एन. डी. पाटील म्हणजे विचार आचारांचे अद्वैत. बांधिलकीपुढे काणाचाही मुलाहिजा न ठेवण्याची प्रतिबद्धता. शेतकरी कामगार पक्ष संयुक्त महाराष्ट्र चळवळ, रयत शिक्षण संस्था विकास, कापूस एकाधिकार योजनेचे जनक, सहकार

वेचलेली फुले/१६५