Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/167

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चळवळीच्या शुद्धीकरणाचे प्रणेते, सेझला मूठमाती देणारे, बळीराजाचा तारणहार अशा कितीतरी अंगांनी डॉ. एन. डी. पाटील यांनी गेल्या पन्नास वर्षांत जो समाज परिवर्तनाचा घणाघाती झंझावात निर्माण केला त्यातून त्यांची थोरवी प्रत्ययास येते.

 या ११ चरित्र नायकांचे जीवनकार्य चरित्र ग्रंथमालेच्या रूपाने प्रकाशित करून श्रमिक प्रतिष्ठानने मोठे औचित्य साधले आहे. जात, धर्म प्रतिवादाला गेल्या शतकात छेद देत समाजधुरिणांनी सामाजिक सलोखा निर्माण केला. त्याच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता वाटत असताना या चरित्रांचे प्रकाशन ही मोठी सकारात्मक रचना आहे. ज्यांना आपली मुले-मुली सामाजिक सलोखा सांभाळत नव्या भारताच्या उभारणीचे सूत्रधार व्हावे, असे वाटते त्यांच्यासाठी ही चरित्रे म्हणजे नवयुगाची प्रेरके होत. कॉ. गोविंद पानसरे, यांचा विचार, संपादक मंडळाची क्रियाशीलता, लेखक समूहाचे समाजभान त्यांच्या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेली चरित्रमाला एकविसाव्या शतकातील कोल्हापूर समाजशील बनवेल असा विश्वास वाटतो.


• चरित्र ग्रंथमाला (चरित्र)

 प्रकाशक - श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर
 प्रकाशन वर्ष - २०१२

 किंमत - १000 रु. (आकरा पुस्तकांचा संच)

♦♦

वेचलेली फुले/१६६