पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/155

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिनं मेडिकलला प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे हा वास तिच्या परिचयाचा असतो. पाल चुकचुकते नि लक्षात येते की मधुचंद्राची पुष्पशय्या उपभोगत असताना आपली कूस फुलशय्येने (बंगालीत ‘फूल' म्हणजे ‘फोड') उजवली जात आहे. नवग्याच्या लिंगाच्या (शिश्न) टोकावरचा लाल फोड तिला न सांगताही त्याच्या बाहेरख्यालीपणा समजावतो. अन मग ती कोसळते ती कायमचीच.

 ‘उधाण वारा' वाचत असताना स्त्री जीवनाची घालमेल समजत जाते. हे सारे समजल्यावर एखाद्या स्त्रीने फारकत घेतली असती, पण ती 'रोद' (रुद्रचे हे प्रेमातले रूपांतर) ला सुधारायचे ठरवते. बंगाली भाषेत रोद म्हणजे ऊन. तसलिमाला तो सकाळ म्हणायचा. 'रोद’ नि ‘सकाळ' एकमेकांस पत्र, कविता लिहीत राहिले. रोज येणा-या रात्रीचं आकाश तरीही घेऊन येऊन नव्या ऊनांची सकाळ म्हणून! पण रात्रीच्या गर्भात नेहमी उष:काल असतोच असे नाही. एखाद्याचं जीवन वाट चुकलेल्या रस्त्याचा निबीड जंगलातील न संपणारा जीवघेणा प्रवास असतो, तो तसलिमाने या उधाण वाच्या'त मांडलाय.

 ही आत्मकथा स्त्रीची शोकात्म गाथा होय. ती स्त्रीचा आत्मशोधही आहे. स्त्रीचे हळवे मन इथे आहे नि कठोर संघर्षही! वैचरिक द्वंद्वांचा शाप घेऊन येणारे स्त्री जीवन समजून उमजून जोखिमांच्या मृगजळामागे का धावते ? यातले पुरुष नेहमी शेण का खातात? (नाना, वडील, नवरा सारे रखेल ठेवणारे एका माळेचे मणी) हा अनादि संघर्ष यात व्यापून आहे, तोच या उधाण वाच्यात सर्वत्र घोंगावतोय! ही आत्मकथा एकाच वेळी ‘वाचनीय' प्रेमकथा नि दुसरीकडे स्त्रीची शोकगाथा म्हणून विचारणीय' ऐवज ठरते ती लेखिकेच्या कुशल शैलीमुळे. पत्र, कवितांनी तिला ललित मधुर, तरल केलंय आणि त्यातील प्रश्नांनी घन-गंभीरही

 ‘उधाण वारा' स्त्रीच्या वय:संधीची गाथा आहे. कैशोर्य ते युवावस्थेचा हा प्रवास स्त्रीच्या बिकट वाट वहिवाटीचा आदिम प्रवास होय. तो वाचत असताना आपण प्रेमाच्या अथांग डोहात बुडून जातो. लेखिकेबरोबर वाचक जीवनाच्या अशा चक्रव्यूहात अडकतो की त्यातून परतीची वाटच नसते. ही आहे मानवी जीवनाची आदिम कहाणी... ‘खाये तो भी, न खाये तो भी पश्चात्ताप ठरलेलाच! तरी जगण्याची, माणसाच्या मनातली अनिवार आशादायी । ओढ, इथे वाढत्या वयाच्या साच्या पाऊलखुणा आहेत. आपण उंच झालोच, या अजून छातीला आकार न आल्याची हरहर. आपण मोठे झालोय, तरी आपणाला काही कळत कसे नाही याचे कोडे, आपले कोण नि परके कोण हे

वेचलेली फुले/१५४