अशी अनेकांगी वैशिष्ट्ये लाभलेले हे चरित्र डॉ. विश्राम रामजींच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव असा की, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज स्थापल्यावर अनेक समाजधुरीण, उच्चवर्णीयांच्या कुटाळकीचा सत्यशोधक मंडळींना त्रास व्हायचा. डॉ. विश्राम रामजींमुळे तो बंद झाला. यावरून त्यांच्या चरित्राची ओळख पटते. पुण्याचे कमिशनर असलेले डॉ. घोले तत्कालीन व्हाईसरॉयचे सर्जन होते. रावसाहेब, रावबहाद्दर पदवी संपादणारे डॉ. घोले यांना तत्कालीन सरकारने 'सरदार' पदवी द्यायचे एवढ्यासाठीच नाकारले की, त्यांच्याकडे जमीनजुमला नव्हता. या नि अशा अनेक अप्रकाशित प्रसंगांची पेरणी करत लिहिले गेलेले हे चरित्र म्हणजे महाराष्ट्राच्या एकोणिसाव्या शतकातील समाजजीवनाचा, मनुष्यसंबंधाचा समाज सुधारणांचा जिवंत इतिहासच. तो वाचताना वाचक शंभर वर्षे मागे केव्हा जातो नि त्यात रमतो, हे त्यालाच कळत नाही. हे या चरित्रग्रंथाच्या यशाचेच चिन्ह होय. शतकापूर्वीचा काळ व व्यक्तिसंदर्भासह सजीव करण्याचे कौशल्य संशोधन श्रमाचे फळ होय.
तीच गोष्ट ग्रंथातील ‘खेडकर परिवार' या दुस-या भागाचीही आहे. डॉ. विश्राम रामजी घोले यांची कन्या गंगूबाई हिचा विवाह डॉ. रघुनाथराव खेडकर यांच्याशी झाला. त्यांच्या परिवाराची चरित्र कहाणी सांगणारा हा भाग. डॉ. रघुनाथराव खेडकर प्रार्थना समाजी. त्यांच्या पत्नी गंगूबाई वेदान्त प्रचारक डॉ. रघुनाथरावांनी हिंदू मिशनरी म्हणून कार्य केले. आपल्या सांगण्याप्रमाणेच त्यांनी कुशल धन्वंतरी म्हणून लौकिक मिळविला. यादव समाजाची अखिल भारतीय संघटना बांधली. पत्नी गंगूबाईही तत्कालीन समाजजीवनाच्या पार्श्वभूमीवर वेगळे जीवन जगली. मागासवर्गीय असून इंग्रजीत शिक्षण, पतीबरोबर परदेश प्रवास, अमेरिकेत एकोणिसाव्या शतकात भारतीय स्त्रीने इंग्रजीत भाषण देऊन तेथील वृत्तपत्रांची प्रशंसा संपादणे या सा-या गोष्टी काळाच्या संदर्भात केवळ अचंबित करणाच्या.
डॉ. अरुणा ढेरे यांनी या संशोधनपर ग्रंथाने तत्कालीन व्यक्तिसंबंध, समाजजीवन, जाती व्यवस्था, धर्मातर, नवनवीन समाजाच्या (सत्यशोधक, सत्यधर्म, प्रार्थना समाज, थिऑसॉफिकल लॉज इत्यादी) स्थापना, ब्रिटिश राजकारण, स्त्री शिक्षण, ब्राह्मणेतर समाजाचा शिक्षण विकास यासंदर्भात अनेक प्रकारची नवी माहिती उजेडात आणली आहे. आजकाल बहुजन समाजोन्नतीबद्दल बरेच लिहिले बोलले जाते. अशा पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेऊन समाजघडणीची व परिवर्तनाची ज्यांना वस्तुनिष्ठ चिकित्सा करायची आहे, त्यांना हा ग्रंथ उद्बोधक ठरतो. या ग्रंथास जोडलेली परिशिष्टे मूळ ग्रंथा इतकीच किंबहुना अधिक उद्बोधक होत. डॉ. रघुनाथराव खेडकरांचे