पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांचे मूळ नाव,अल्यिक्सेई मक्स्यीमव्हिच प्येश्कॉव्ह. दोघांच्या साहित्यकृतींचे अनेक भाषांत अनुवाद झाले. दोघांच्या साहित्यातील पात्रे सामान्य; पण ध्येयवादी. दोघांचा लेखनाचा प्रभावकाळ विसाव्या शतकाचा पूर्वार्ध. दोघांनी समाजवादी वास्तववाद स्वीकारला; पण खांडेकर कल्पनेत अधिक रमायचे. दोघांनी आपल्या साहित्य आणि विचारांनी पिढीस भारावून टाकले होते. दोघांच्या साहित्यात दोष होते; पण गुणांची सामाजिक बलस्थाने इतकी मजबूत होती की, त्यांना जीवन जगण्यासाठी कधी कलेचं कातडं पांघरावं लागलं नाही. म्हणून वि. स. खांडेकरांमध्ये मॅक्सिमम मॅक्झिम गॉर्की दिसून येतो. गॉर्कीचा एक अर्थ दुःखी आहे. दोघेही जन्मभर दुःखीच होते. त्यांना आपल्या स्वप्नातलं जग पाहता आले नाही; पण बदलाच्या पाऊलखुणांनी दोघांना आश्वस्त केले होते. त्यातून त्यांना जगण्याची उमेद नक्कीच मिळाली होती.

वि. स. खांडेकर चरित्र/९१