पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असावे लागते.कथा नुसती संवादरूप लिहिली की झाले असे नसते. त्याला कॅमे-याची फ्रेम माहीत हवी. संवाद, प्रसंगांचे दृश्यभाग करता यायला हवेत. इतकेच नव्हे तर कॅमेरा, दृश्य, प्रकाश दृश्यमिश्रण, इत्यादींचे म्हणजे Fede in, Exterior, Mix, Cut, Inter cut, Quick Dissolve, Fede out, HR माहीत हवे, तरच पटकथाकार ललित, सुंदर चित्रपट बनवू शकतो. हे ज्ञान व तंत्र वि. स. खांडेकरांना अवगत होते म्हणून ते 'छाया', ‘ज्वाला', ‘देवता', ‘सुखाचा शोध', 'माझं बाळ', 'अंतरीचा दिवा', 'माणसाला पंख असतात'सारख्या श्रेष्ठ ललित पटकथा लिहू शकले. खांडेकरांनी चित्रपटांसाठी गाणी, गीते पदेही लिहिली होती, हे फार कमी लोक जाणून असावेत. ‘अंतरीचा दिवा' हा सचित्र पटकथा संग्रह असून तो मराठी चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक ऐवज म्हणूनही महत्त्वाचा ठरतो. त्यांचे अन्य भाषी चित्रपट भाषांतरित, ध्वनिमुद्रित निर्मिती होती. काही स्वतंत्रही निर्मिले गेले. छोटे संवाद, सुंदर शब्दकळा, संवादात अलंकारांची पेरणी, नादमधुर भाषा, काव्यात पदलालित्य, दृश्यांची प्रत्ययकारी गुंफण यांमुळे या पटकथा ललित अंगांनी श्रेष्ठ ठरल्या होत्या. वि. स. खांडेकर कोटीबाज लेखक म्हणून उदयाला आले होते. (१९१९) त्याचा फायदा त्यांना सरकारी पाहणे', 'लग्न पाहावं करून'सारख्या विनोदी पटकथा लिहिताना झालेला दिसतो. कथाविकास, चरित्रचित्रण, दिग्दर्शन, प्रसंगांची चपखल रचना ही त्यांच्या पटकथांची ठळक ललित वैशिष्ट्ये होत. आशय व अभिव्यक्तीचा संगम हे खांडेकरांच्या वैविध्यपूर्ण ललित वाङ्मयात सर्वत्र दिसून येते. विचार व भावनांची सखोलता (Profondita dell's anima) आणि आशयघनता व व्यापकता (Largeness of soul) अशी वाङ्मयीन महात्मतेची व ललित साहित्याच्या श्रेष्ठत्वाची जी लक्षणे जगभर मानली गेलीत, त्या निकषांवरही वि. स. खांडेकरांच्या साहित्याचे लालित्य प्रत्ययकारीच म्हणायला हवे.

 ग्रॅहम हाउ (Graham Hough) चे एक सुंदर समीक्षात्मक पुस्तक आहे। 'Style and Stylistics' नावाचे. त्यात त्याने म्हटलंय - 'The organic unity of a work of literature is not something readymade; it is not an entire and perfect chrysolite (Holst, f14SII) found lying about in nature; it is something achieved.' (page - 11) साहित्य, विशेषतः ललित साहित्य ही एक सेंद्रिय संघटित कृती होय. ती तयार नसते. तयार करावी लागते. प्रयत्नसाध्य कारिगिरी असे तिचे वर्णन करता येईल. वि. स. खांडेकरांच्या या अचर्चित ललित साहित्याचा कालपट लेखन प्रारंभापासून (१९१९) ते मृत्यू (१९७६) पर्यंतचा सुमारे सहा दशकांचा. या काळात खांडेकरांनी

वि. स. खांडेकर चरित्र/१३३