पान:वि. स. खांडेकर चरित्र (V. S. Khandekar Biography).pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निरंतर ऊर्जस्वल लिहिण्याचा प्रघात ठेवला. त्यास बैठक बहुभाषी वाचनाची होती तशी बहुश्रुततेची. पूर्वसुरींचे ऐकायचे, वाचायचे, पाहायचे. प्रारंभी अनुकरण होते. मध्यंतरी स्वातंत्र्य घेतले. उत्तरायणात नवी वाटच निर्माण केली. 'ययाति'ला मराठीचे पहिले ज्ञानपीठ हे लौकिक यश; पण ललित यश म्हणाल तर शतक उलटले तरी वाचक तुटला नाही. आज तो मोबाईल व टॅबवरही ‘खांडेकर' वाचतो, हे त्यांच्या ललित साहित्याचे खरे श्रेय व प्रेय।

वि. स. खांडेकर चरित्र/१३४