पान:विश्व वनवासींचे.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
डॉ. भीमराव गस्ती

 डॉ. भीमराव गस्ती हे त्यांच्या 'बेरड' या आत्मकथनामुळे सुपरिचित आहेत. त्यानंतर 'बेरड'चा पुढचा भाग 'आक्रोश' हाही आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि लवकरच 'सांजतारा' हा कथासंग्रह आणि 'कौरव' ही कादंबरी आपल्याला वाचावयास मिळणार आहे. असे हे ४ पुस्तकांचे लेखक डॉ. भीमराव गस्ती साहित्यिक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. पण भीमराव गस्ती केवळ लेखक आहेत असे नव्हे तर ते एक समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व आहे. डॉ.भीमराव गस्ती यांनी आपल्या कार्यातून मूर्तिमंत समाजकार्याचा वस्तुपाठ आपल्यासमोर ठेवलेला आहे.

 डॉ. भीमराव गस्ती जबरदस्त सामाजिक जाणीव असलेले कणखर व्यक्तिमत्त्व आहे. ज्या समाजात ते जन्मले तशाच बेडरपणे/ निर्भयपणे ते समाजकार्यात उतरलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात या गोष्टींचा उल्लेख सर्वत्र झाला आहे.

 त्यांची शैक्षणिक गुणवत्ता चकित करणारी आहे. ते बी.एस्सी./ इंजिनिअरिंग (B.Sc. with Engineering) असून एम.टेक. (M.Tech.) आहेत. रसायनशास्त्र (Chemistry) हा त्यांचा विशेष संशोधनाचा विषय आहे. त्यांनी मास्को येथील पार्टिक लोमॅम्बो (Paretic Lomabo) विद्यापीठातून डॉक्टरेट इन केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे पीएच.डी पदवी मिळवली आहे.

 उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता असूनही ते आज ज्या कार्यात पूर्णपणे झोकून देऊन उतरलेले आहेत, ते कार्य म्हणजे भटक्या विमुक्तांचा विकास, दीन-दुबळ्या मागासवर्गीयांचा विकास, देवदासींचा विकास होय. त्यासाठी ते वसतिगृह चालवितात. ग्रामीण विकासाचे काम त्यांनी हाती घेतलेले आहे.

 माझ्या माहितीप्रमाणे जवळपास दोनशे ते तीनशे खेड्यांमध्ये त्यांचे हे कार्य चालू असून त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी अतुलनीय

९७