पान:विश्व वनवासींचे.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 दिवा इकडून तिकडे नेताना विझू नये म्हणून खेड्यात आपल्या पदराने झाकून नेतात व दीप ज्योत प्रज्वलित राहते त्याचप्रमाणे डॉ. सरोजिनी बाबरांनी या लोकवाङ्‍‍मयाच्या दीपाला जपले आणि उज्ज्वल ठेवले.

 विपुल भटकंती करून लोकसाहित्याचे क्षेत्रीय संशोधन आणि प्रचंड प्रमाणातील संकलन त्यांनी केले. त्यांची प्रत्येक प्रस्तावना आणि ठिकठिकाणी ग्रंथात दिलेल्या टीपा अत्यंत मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत. कारण प्रत्येक अनुभवातून-भेटीगाठीतून हे लेखन संकलन त्यांनी केलेले आहे.

 शासनाच्या महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. या माध्यमातून त्यांनी लोकसाहित्य संकलनाबरोबरच अभ्यासकांनाही संघटित केले. डॉ. ग.मो. पाटील, डॉ. यू.म. पठाण, डॉ. गंगाधर मोरजे, डॉ. प्रभाकर मांडे, प्रा. द.ता. भोसले, प्रा. तारा भवाळकर, डॉ. रा.चिं.ढेरे आणि डॉ. अरुणा ढेरे इ. अशी कितीतरी नावे सांगता येतील.

 माझ्या खुणा माझ्या मला (आत्मकथा), तीर्थांचे सागर, कुलदैवत, एक होता राजा, दसरा-दिवाळी, नादब्रह्म, आदिवासींचे सण व उत्सव, जाई-मोगरा, महाराष्ट्र लोकसंस्कृती व साहित्य, साज शिणगार, झोळणा, लोकसाहित्याचा जागर, भारतीय स्त्रीरत्ने, नंदादीप, भारतीय स्त्री, असू दे मी खूळी, भूकलाडू - तहानलाडू, आजोळघरची शाळा, राधाई, वडिलांचे सेवेसी, वनिता सारस्वत, बाळराजा, जा माझ्या माहेरा, कारागिरी, जनलोकांचा सामवेद, लोकसाहित्यमाला, भाषा आणि संस्कृती, लोकसाहित्याचा शब्दकोष, राजविलासी केवडा, बालनाटिका (भाग १ ते ४) कमळीचं जाळं, अजिता, तू भेटायला नको होतास, आणि इथे गोष्ट संपली, हिरवा चुडा, आठवतंय तेवढं सांगते, चिंचेची पत्रावळी, नव्याची पुनव, सुंबरान मांडिलं, झालं गेलं सांगते, राही रुक्मिणी, माहेरचा चंद्र, डोंगरची मैना, रुखवत, देवदर्शन इत्यादी. ही त्यांची ग्रंथसंपदा प्रचंड आणि समृद्ध आहे. त्यात कथा, कादंबऱ्या, आत्मकथानक, संपादित बालसुलभ अशा सर्वच प्रकारचे साहित्य आहे. त्यात या लेखनाने मराठी वनवासी लोकसंस्कृतीचे एक बावनकशी मराठमोळे दालन बहरले आहे, असे म्हणता येईल.

संपन्न व्यक्तिमत्व

 डॉ. सरोजिनी बाबर परमार्थाने एक संपन्न वाङ्‍‍मयीन व्यक्तिमत्व

सरोजिनी बाबर

९३