पान:विश्व वनवासींचे.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणीबाणीच्या काळात दिल्ली येथे रामलीला मैदानात आणिबाणी लादणाऱ्या सरकार विरोधात भव्य सभा आयोजित करून त्यांनी लोकजागृती केली. तसेच १९८१ मध्ये दिल्ली येथे पहिले अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले. नागालँडचे नागा नेता एन.सी.झेलीयांग केवळ रामभाऊ यांच्या संपर्कामुळे अध्यक्ष झाले. तेव्हापासून ते हिंदुत्ववादी नेता आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकते झाले याचा दूरगामी परिणाम पूर्वांचलाच्या कार्यात झाले.

 देशाची अर्धी लोकसंख्या महिलांची असल्यामुळे महिला संघटन उभाराव असा रामभाऊ यांचा विचार सर्वमान्य झाला. त्यादृष्टीने वनवासी महिला संघटनकार्य त्यासाठी संपर्क सुरू झाला. मध्यप्रदेश आणि छत्तीसगड भागात या कामाला प्रारंभ झाला. १९८५ साली 'भिलाई' येथे पहिले महिला संमेलन घेण्याचे ठरले. रामभाऊ यांनी प्रकृती अस्वस्थ असूनही या संमेलनात सर्व जबाबदारी घेतली. विशेष म्हणजे या संमेलनात नाग संस्कृतीची रक्षक इंग्रजांच्या राजवटीत १६ वर्ष तुरुगवास भोगणारी नागालँडच्या स्वातंत्र्यासाठी झगडणारी "राणी मा.गायडीनलू" पूर्ण वेळ उपस्थित होती.

 तसेच वनवासी युवकासाठी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी, युवकांच्याही संघटनकार्य, खेळातील आवड वाढविण्यासाठी १९८७ साली मा.रामभाऊ यांच्या नेतृत्वाखाली खेळकूद स्पर्धा यशस्वी झाल्या. वनवासी युवकातील उपजत धाडसी, बळकटपणाला वाव मिळाला. त्यातूनच आज विश्वजेते मेजर माथुर, अशोक साठे, लीम्बाराम यासारखे खेळाडू, कविता राऊत सारखी महिला क्रीडापटू गाजत आहेत.

 पुढे प्रकृती खालावत गेल्यामुळे १९८८ पासून रामभाऊ आपल्या भाचीकडे विश्रांतीसाठी राहावयास गेले. अखेर सन २००३ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या या श्रेष्ठ कुशल संघटकाची जीवनज्योत मालवली.

स्वर्गीय रामभाऊ गोडबोले

९१