पान:विश्व वनवासींचे.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. जनसंघाच्या कामातून त्यांनीच प्रचारक म्हणून सिद्ध केलेल्या श्री. वसंतराव भागवत यांनी संघटन मंत्रिपद स्वीकारून रामभाऊ यांना मोकळीक दिली. रामभाऊ म्हाळगी नंतर ते जनसंघाचे संघटन मंत्री होतेच. महाराष्ट्रात जनसंघ वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. वडाळा येथील चंचल स्मृती कार्यालय याची साक्ष आहे.

 नंतर रामभाऊ यांना पूर्वाचलाचे पूर्वोत्तर राज्यात वनवासीचे काम करण्याचे दायित्व आले. पूर्णकालीन कार्यकर्त्याचे जीवन कमलपत्रवत असावे अशी त्यांची धारणा आणि आग्रह असे. मा.मोरोपंतजी पिंगळे त्यांना आदर्श कार्यकर्ते म्हणत असत. व्यक्तिगत ओळख, स्नेह, आत्मीयभाव, चिन्तन, अजोड वक्तृत्व, संघटन कौशल्य यावर भर देऊनच त्यांनी वनवासींचे कार्य सातत्याने चालू ठेवले. भाषा, प्रांत, लोक यांच्या समस्या त्यांना कधी भेडसावत नसत. कोणत्याही क्षेत्रात ते कार्य करण्यास तत्पर असत. कारण ते हाडाचे कार्यकर्ते होते. ते प.बंगालमध्ये असताना नागालँड आदी भागात त्यांचा संपर्क होता.

 त्याचवेळी त्यांना उत्तर पूर्वांचलाचे दायित्व देण्यात आले. नागनेता श्री एलसी जेलीपांग यांच्याशी त्यांचा परिचय झाला. वनवासी समस्यांविषयी त्यांचे चिंतन-मनन दांडगे होते. १९७७च्या काळात वनवासी कल्याण आश्रमाचे संघटन मंत्री म्हणून त्यांनी प्रचंड काम उभे केले. वनवासींच्या श्रेष्ठ संस्कृतीचे आणि अस्मितेचे संरक्षण व्हावे असे त्यांना प्रकर्षाने जाणवले होते. म्हणूनच त्यांनी मा.दत्तोपंत ठेंगडी, बाळासाहेब देशपांडे, प.पू.तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याशी चर्चा करून वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य अंगिकारले होते. अखिल भारतीय संघटन मंत्री म्हणून व.क.आ.चे संस्थापक बाळासाहेब देशपांडे यांचे सहकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मा. रामभाऊ यांचे मुख्यालय मुंबई होते. तेव्हापासूनच वनवासी कल्याण आश्रमाचे कामकाज मुंबईहून होऊ लागले. रामभाऊ यांना मुंबई सुपरिचित होती. त्यांचा कामाचा झपाटा आणि आवाका विलक्षण असल्याने व.क.आ.चे काम वाढले. चंचल स्मृतीतच मग केंद्रीय कार्यालय आले. त्यांच्या मार्गदर्शनाने धनुर्धारी वनवासी असे बोधचिन्ह निश्चित केले गेले. तसेच प्रचार-प्रसार म्हणून 'वनबंधू' मासिक सुरू झाले. १९७५ च्या

९०
विश्व वनवासींचे