पान:विश्व वनवासींचे.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्व. रामभाऊ गोडबोले

 कै. रामभाऊ गोडबोले हे मूळचे पुण्याच्या कसबा पेठेतील निवासी. त्यांचे वडील बिन्दुराव हे भारतीय सेनेत होते. रामभाऊंचा जन्म १९२० सालचा. त्यांनी एम.ए. संस्कृत पर्यंतचे सगळे शिक्षण विशेष प्राविण्यासह पूर्ण केले. १९३६मध्ये प.पू. डॉ. हेडगेवार यांच्या एका बौद्धिकातून प्रेरणा घेऊन ते संघ स्वयंसेवक झाले. रामभाऊ यांना संघाची गोडी लावण्याचे श्रेय जगन्मित्र मा. अंतराव देवकुळे यांनाही जाते.

 प. पू. डॉ. हेडगेवार यांच्या महानिर्वाणानंतर द्वितीय सरसंघचालक श्री गुरुजी यांनी ज्यांचे शिक्षण पूर्ण झाले त्या सर्वांना संघ समर्पित होण्याचे आवाहन केले. त्याला भरघोस मिळालेला प्रतिसाद म्हणजे २०० पूर्णवेळ संघ प्रचारक संघ जीवनव्रती बनले. महाराष्ट्रातील या प्रचारकासह रामभाऊही सन १९४२ पासून पूर्णवेळ संघ प्रचारक झाले. रामभाऊ प्रथम सांगली जिल्ह्याचे प्रचारक झाले. त्यानंतर पुणे जिल्हा प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. संघ प्रचारकाची साधी, स्वच्छ नेटकेपणाची त्यांची राहणी जीवनभर होती. धोतर, हाफ शर्ट असाच त्यांचा पेहराव कायम होता. प्रचारक असताना त्यांनी काही पथ्ये कटाक्षाने पाळली होती. प्रवासात असताना आपल्या स्वयंसेवकाकडेच निवास करावयाचा, कुटुंब परिचय करून घ्यायचा, आत्मीयता निर्माण करावयाची. त्यामुळे त्यांचा संपर्क घराघरात पोहोचला होता. याचप्रमाणे संघचालकांना प्रत्येक गावी भेटणे हा जणु त्यांचा दंडकच होता. ते कुशल संघटक होते. त्यामुळे त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडविले. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे जनसंघाचे प्रभाकरपंत पटवर्धन होय. रामभाऊंना ते आपल्या गुरुस्थानी मानीत असत.

 कार्यकर्ता निर्माण म्हणून त्यांनी प्रांत आणि जिल्हा स्तरावर अनेक अभ्यास वर्ग घेतले. त्यात त्याग, बलिदान, देशभक्ती, देशसेवा हेच बौद्धिकांचे प्रेरक विषय असत. त्या प्रेरणेतून डॉक्टर, वकील, अभियंता, व्यावसायिक, कलावंत, विद्यार्थी, महिलावर्ग असे सगळेच जोडले गेले. ते प्रचारक-सक्रीय कार्यकर्ते झाले. त्याची यादी मोठी

८९