पान:विश्व वनवासींचे.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वनवासी समाजाचे हित कसे होईल? आपल्या धर्माचीसंस्कृतीची रक्षा तो स्वत: कशी करू शकेल? स्वाभिमानपूर्वक आणि आपली अस्मिता सांभाळून वनवासी आपले जीवन कसे जगू शकेल? याचीच अहोरात्र चिन्ता ते वाहात होते.

 त्यांच्या संघटन कौशल्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य उत्तर-पूर्वांचलात संपूर्ण गिरीकंदरात सर्वत्र व्यापले गेले. अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलन सिलिगुडी येथे भरले असता, त्यात ते म्हणाले, "हमारे साथ पूरा भारत है। यह भावना जब हमारे अंदर जागृत हो जायेगी, तब इस अनुभूतीसे हमारा कार्य और भी विस्तार प्राप्त कर सकेगा ।"

 त्यांनी भारतीयांच्या मानसिक विकासाला प्राधान्य दिले.

 वयाच्या ८३व्या वर्षी दि. १२ जानेवारी २००२ला या महान वनयोगी महापुरुषाने आपली इहलोक यात्रा संपविली.

(संदर्भ : 'हमारे महान वन नायक' भाग - २ प्रो. त्रिलोकी नाथ, सिंहना)

***

८८
विश्व वनवासींचे