पान:विश्व वनवासींचे.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल.

 के. भास्करराव नावाने केरळीय परिवेश धारण करून कळंबी यांनी अभूतपूर्व विक्रम केला. आपल्या ३८ वर्षाच्या सुदीर्घ काळात त्यांनी प्रांत प्रचारक म्हणून सव्वा कोटी संख्या असलेल्या, केरळच्या १३ जिल्ह्यात एकूण २००० शाखा सुरू केल्या. व्यापक जनाधार, दृढनिश्चय या जोरावर भास्कररावजींनी संघ शक्तीचा विस्तार, सामाजिक परिवर्तन, धार्मिक सुधार केरळसारख्या कम्युनिस्ट प्रांतात घडून आणल्या. हिंदुत्त्व नवजागरणाचा एक इतिहास त्यांनी घडविला. हृदयावरील शस्त्रक्रियेमुळे भास्कररावजींना डॉक्टरांनी एका जागी बसून राहायला सांगितले. पण एका जागी बसून राहायचे तर जगायचे कशासाठी? पर्याय म्हणून संघाने त्यांच्या प्रकृतीनुरूप उत्तरदायित्व दिले. तृतीय सरसंघचालक पूज्य बाळासाहेब देवरस यांच्या प्रेरणेने सन १९७७ मध्ये वनवासी कल्याण आश्रमाला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले होते. वनवासी कल्याण आश्रमाचे काम संपूर्ण देशात तीव्रतेने वाढत होते. भास्कररावजींना सहसंगठन मंत्री नियुक्त केले गेले. सन १९८४च्या अखिल भारतीय संमेलनात या उत्तरदायित्वाची घोषणा पूज्य बाळासाहेब देशपांडे यांनी केली. नंतर १९८६मध्ये मा. रामभाऊ गोडबोले यांनी प्रकृती कारणास्तव सतत ८ वर्षे जबाबदारी पेलून थांबल्या नंतर मा. भास्करराव अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय संगठन मंत्री झाले. १४ वर्षे ही जबाबदारी त्यांनी प्रभावी रूपात सांभाळली. या क्षेत्रात संपूर्ण अनभिज्ञ असल्याने त्यांनी प्रथम वनवासी समाज, कार्यकर्ता, कार्यपद्धती, कार्य संस्कृती नीट जाणून घेतली. पहिली ३/४ वर्षे खेड्यापाड्यातून वनवासींमध्ये प्रवास केला म्हणूनच १९८४ ते २००० अशी १६ वर्षे हा कालखंड वनवासी कल्याण आश्रमाच्या उत्कर्षाची समाजाला ओळख करून देणारा ठरला.

 मा. भास्कररावजी बहुभाषीय होते. त्यांचा प्रवास जिथे जिथे होई तेथील लोकभाषा शिकून त्याच भाषेत ते कार्यकर्ते-लोकांशी बोलत. त्यामुळे त्यांना १४ भाषा येत होत्या. त्यांचे व्यक्तित्व पारदर्शी होते. त्यांचा मनसा-वाचा-कर्मणा एक व्यवहार असे.

भास्करराव कळंबी

८७