पान:विश्व वनवासींचे.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भास्करराव शिवराम कळंबी

 कै. भास्करराव कळंबी हे मूळचे कोकणातील घराणे. पिता डॉ. शिवराम आणि माता राधाबाई. दिनांक ५ ऑक्टोबर १९१९ला त्यांचा जन्म रंगून जवळील “डास" येथे झाला. त्यांचे पूर्वज मंगेशाचे मूळ निवासी होते. त्यांचे वडील ब्रह्मदेश इथे शासकीय डॉक्टर असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण तेथेच झाले. वयाच्या ११व्या वर्षीच दुर्दैवाने त्यांच्या मातु:श्री निर्वतल्या. तर वयाच्या १२व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठा भाऊ आत्माराम व बहिण अमुलीसह ते मुंबईला आत्या काकाकडे राहावयास आले.

 पुढे त्यांनी रोबेर्टमनी मधून हायस्कूल शिक्षण आणि सेंट झेविएर कॉलेजमधून बी.ए. पदवी प्राप्त केली. नोकरी सांभाळून त्यांनी १९४५ मध्ये एल.एल.बी. पदवी मुंबई विद्यापीठातून मिळवली. १९४६ साली एम.ए.ला प्रवेश घेतला पण श्री गुरुजींच्या इच्छेनुसार आदर भावाने ते पूर्णत: प्रचारक झाले.

 संघ कार्य पसरत पसरत १९३४ ला मुंबईपर्यंत येऊन पोहचले होते. इथे त्यांना येरकुंटवार व महत्त्वाचे म्हणजे प.पू. डॉ. हेडगेवार यांचा जवळून सहवास लाभला. स्वत: डॉक्टर घरोघर एकेक रुपया मागून संघ कार्यालयाचे भाडे भरीत. ते भास्करराव कळंबी यांना घेऊन फिरलेले आहेत. या त्यांच्या ५ वर्षातील सेवेत भास्कररावांना संघ कार्य हे देश सेवा कार्य आहे, हे पुरतेपणी उमगले. देश सेवेसाठी उभे जीवन व्यतीत करण्याचा त्यांनी निर्धार केला. संघ कार्याचे एक तप पूर्ण झाले तेव्हा ते केरळ प्रांत प्रचारक होते. केरळमधील संघ कार्य म्हणजे एक कसोटी, नव्हे तर सत्त्व परीक्षा होती. त्यात भास्करराव कळंबी यशस्वी झाले. उत्तर केरळमधील मुस्लिम बहुल, दक्षिणेकडील ख्रिस्ती बहुल भागात त्यांनी हिंदुत्त्व जगविले. ही त्यांची फार मोठी

८६
विश्व वनवासींचे