पान:विश्व वनवासींचे.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्धशतकाहून अधिक वर्षे वनवासी बांधवांसाठी त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणून, एकसंघ राष्ट्र निर्माण करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. एकीकडे किमान जीवनावश्यक, मुलभूत सुविधांपासूनही वंचित असा वनवासी समाज तर दुसरीकडे नगरवासी समाज ही दरी कमी होण्यासाठी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अटोकाट प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी वनवासी कल्याण आश्रम आपल्या विविध सेवा भावी योजना राबवित आहे. त्यामध्ये छात्रावास-वसतिगृह, आरोग्यकेंद्र, आरोग्यरक्षक योजना, कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग केंद्र ग्रामविकास प्रकल्प, बचत गट, हितरक्षा आणि श्रद्धाजागरण, खेलकूद प्रकल्प, कृषी विकास, पूरक-पोषक आहार आणि पर्यावरण संरक्षण, बालवाड्या, संस्कार केंद्र इत्यादींचा समावेश होतो. अशा या वनवासी कल्याण आश्रमाच्या महोदात्त कार्यामध्ये आपण सक्रीय सहभाग दिला पाहिजे.

 या वनवासी क्षेत्रातील कर्तबगार माणसाचा जीवन आलेखही एक फार मोठे आव्हान आहे. तो पाहिला म्हणजे याची कल्पना येते. त्यांनी शाळा, छात्रावास, आश्रमशाळा काढल्या त्या वनवासींच्या संघटन सामर्थ्यासाठीच. म्हणून ती शक्तिकेंद्रे बनली. बाळासाहेब देशपांडे यांच्या स्वीकृत कार्यपूर्तीनंतर वयाच्या ८२व्या वर्षी त्यांचे महानिर्वाण झाले. १९७५ साली आणिबाणीत बाळासाहेबांना 'मिसा' कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. तेव्हा ते आपले बंदिवासातील एक सहकारी मोरूभाऊ केतकरांना म्हणाले होते, तेच खरे ठरले. 'कल्याण आश्रमाचे कार्य ईश्वरीय असल्यामुळे, पुढेसुद्धा ईश्वरकृपेने जनसहकार्याने वाढेल' आणि ते प्रत्यक्षात वाढलेही.

***

बाळासाहेब देशपांडे

८५