पान:विश्व वनवासींचे.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घालवला. १९४८ला महात्मा गांधींची हत्या झाली. तेव्हा नागपूरला हाहा:कार निर्माण झाला होता. स्वयंसेवकांच्या घरावर आक्रमण झाले. तेव्हा त्यांचे मोठे भाऊ पुढे आले. तेव्हा ते प्रसिद्ध वकील होते. त्यांना गर्दीतील नेत्यांनी पाहिले तेव्हा हे तर आपले वकीलसाहेब आहेत त्यांनीच मदत केली होती. आपल्याला सोडविले होते. म्हणून त्यांना काही करू नका. अशाप्रकारे आक्रमकांची गर्दी कमी झाली. त्यावेळेस मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री श्री. रविशंकर शुक्ल होते.

 श्री. ठक्करबाप्पाने श्री. बाळासाहेब यांच्या कार्याची सुरुवात व यश पाहून त्यांना २५१/- रु.चा पुरस्कार दिला. १९४९ला ठक्करबाप्पांचा दौरा जयपूरला झाला तेव्हा त्यांनी ठिक-ठिकाणी प्रचारकार्य केले. वनवासींना त्यावेळेस सांगितले, की 'पादरींना घाबरू नका. आपला देश स्वतंत्र झाला आहे.' अशाप्रकारे वनवासी बांधवांत साहस व जागृती निर्माण केली. आनंदी वातावरण निर्माण झाले. जय हिन्दची घोषणा केली गेली. ह्यावेळेस बाळासाहेब आपल्या पत्नीबरोबर होते.

 श्री. बाळासाहेबांवर त्या वेळेस कारवाई झाली होती. ती कारवाई त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बंद करायला लावली. सन १९७८-९३ पर्यंत श्री. बाळासाहेबांनी देशामध्ये कानाकोपऱ्यात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला भेटून मार्गदर्शन केले.

 १९९५ला स्वामी रंगनाथनन्दजी महाराज रामकृष्ण आश्रम यांना हैदराबादला पत्र पाठवून आशीर्वाद मागितले. पत्रात हे सांगितले होते, की माझी तब्येत बिघडली आहे. शरीर कमजोर झाले आहे. आता वनवासी आश्रमाचे कार्य करण्यासाठी कार्यकर्ते तयार झाले आहेत. रामकृष्ण, विवेकानंद यांच्या आदर्शाने सारे जीवन वनवासींची सेवा करण्यात त्यांनी अर्पण केले होते.

 २१ एप्रिल १९९५ला ते स्वर्गवासी झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्ष होते. शेवटच्या दिवशी आपल्या कुलदेवतेचा प्रसाद ग्रहण केला व अर्धाकप दूध घेतले. शेवटपर्यंत ते शांतचित्त राहिले. ११ वाजेपर्यंत बोलत राहिले. शेवटच्या क्षणाला त्यांच्या परिवारातील सर्व माणसे जवळ होती.

 वनवासी कल्याण आश्रम ही संस्था राष्ट्रीय स्तरावर गेली.

८४
विश्व वनवासींचे