पान:विश्व वनवासींचे.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अधिकारी सजावर अली खाँ यानी बाळासाहेबांना अटक केली होती. लोक घाबरावे म्हणून बाळासाहेबांना हातकडी लावून सडकेवरून फिरवले गेले. दुसऱ्या दिवशी नागपूर जेलमध्ये पाठविले. लुटमार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. बाळासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांवर हा आरोप लावला होता. त्या दिवसामध्ये नागपूर जेलमध्ये आचार्य विनोबा भावे, पं. रविशंकर शुक्ल, रामभाऊ रूईकर हे स्वातंत्र्य सैनिक होते. १९४२ला भारत छोडो आंदोलन झाले होते. हिंसक घटना, प्राणहानी झाली होती. त्याच्या सुनावणीसाठी इंग्रजांनी तिकडे स्पेशल न्यायाधीशाची नियुक्ती केली होती. बाळासाहेबांचा मामला त्यांच्याच न्यायालयात होणार होता.

 श्री. बाळासाहेबांच्या बाजूने त्यांचे मोठे भाऊ श्री. श्रीधरराव श्री. बारलिंगे व श्री. एन.टी. मंगलमूर्ती वकील होते. सारे पुरावे बाळासाहेबांच्या विरुद्ध बाजूने जात होते. घटनास्थळी श्री. बाळासाहेब उपस्थित होते. अशी सर्व पुरावे देणाऱ्यांनी ग्वाही दिली. पण रामटेकचे तहसीलदार श्री. हरकरे व कवी श्री. देशपांडे यांनी श्री. बाळासाहेब यांच्याविरुद्ध पुरावा देण्यास इन्कार केला. तेव्हा श्री. बाळासाहेब निरापराधी आहेत अशी घोषणा करून त्यांना सोडून दिले.

 श्री. बाळासाहेबांचे कार्य चालू असतानाच त्यांचे भाऊ श्री.नीलकंठराव मृत्यू पावले. जेलमधून सुटताच कुटुंबाची जबाबदारी श्री. बाळासाहेबांवर आली. त्यावेळेस १९४३मध्ये त्यांचा विवाह अचलपूरच्या श्री. अप्पासाहेब जहागिरदार यांची मुलगी प्रभावती हिच्याशी झाला.

 आर्थिक दृष्टीने परिवाराची स्थिती ठीक नव्हती. म्हणून त्यांनी रॅशन विभागामध्ये नोकरी धरली. आपले कार्य करीत असताना त्यांनी एका मोठ्या व्यापाऱ्याला गैर व्यापारामध्ये पकडले. अपेक्षा ही होती, की त्याला कडी सजा मिळेल पण वरच्या दबावामुळे प्रकरण दाबून टाकले. त्यामुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या घटनेमुळे कठोर कर्तव्यनिष्ठा व अन्याय यांच्या समोर वाकायचे नाही असा त्यांचा स्वभाव निर्माण झाला.

  १९४५ ते १९४८ या वर्षांचा कालावधी त्यांनी शांतपणे

बाळासाहेब देशपांडे

८३