पान:विश्व वनवासींचे.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 स्वभावत: बाळासाहेबांच्या मनात देशभक्ती, अनुशासन व हिन्दुत्व यांचे संस्कार झाले. १९३०ला त्यांनी नागपूरला हिस्लॉप कॉलेजमध्ये वकिली अभ्यासाला सुरुवात केली. १९३८ला बच्छराजजी व्यास यांच्याबरोबर ते एम.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर व्याख्यात्याची नोकरी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला पण यश आले नाही. म्हणून आपले मामा श्री. गंगाधरराव देवरस यांच्या बरोबर रामटेकला वकिलीला सुरुवात केली. पाच दिवसामध्ये ते संघाचे रामटेक तहसील कार्यवाह बनले. श्री. दादा बन्डे, श्री. अण्णा ढोबळे व श्री. जतिराम बर्वे हे त्यांचे मित्र बनले.

 श्री. बाळासाहेबांचे आदरणीय गुरुजी मा. गोळवलकर, यांच्याशी त्यांची प्रथम भेट नागपूरला धन्तोली शाखा, बौद्धिक वर्ग चालू असताना झाली. श्री. गुरुजी त्या दिवसांमध्ये 'वुई' नावाच्या इंग्रजी पुस्तकाचे रूपांतर करत होते. त्यांची पाण्डुलिपी वाचण्याचे काम श्री. बाळासाहेब यांच्यावर सोपविले त्यामुळे त्यांची चर्चा श्री. गुरुजींशी होत होती.

 सुप्रसिद्ध (अंध) वंशीवादक श्री. सावलाराम यांच्या घरी त्यांची भेट होत होती. त्यावेळेस श्री. गुरुजींचा मुक्काम रामटेकला होता. त्यांच्या घरी एक पुस्तकालय होते. श्री. बाळासाहेबांनी तेथील सर्व पुस्तके वाचून काढली. यामुळे श्री. गुरुजी व त्यांचे परस्पर संबंध जुळले. श्री. बाळासाहेबांनी भावी राष्ट्र सेवा जीवनाची पृष्ठभूमी तेथेच निर्माण केली.

 श्री. बाळासाहेबांचे जीवन सुरुवातीपासूनच संघर्षाने परिपूर्ण व आव्हानात्मक बनले होते. एक प्रसंग १९४२चा. जेव्हा महात्मा गांधींनी इंग्रजांना 'भारत छोडो' असे सांगितले होते तेव्हा त्यांना इंग्रज सरकारने पकडले होते. साऱ्या भारत देशात लोकांचा कल्लोळ, राग आवरेना म्हणून लोकांनी मोडतोड सुरू केली होती. पोलीस चौक्यांवर मोर्चे नेले जाऊ लागले आणि डौलात तिरंगा फडकवला गेला. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली होती. मोर्चाचे नेतृत्व स्वत: बाळासाहेब यांनी केले. तेथील तहसील कार्यालयावर तिरंगा फडकावला व तेथेच इंग्रजांचे रामटेक सरकार समाप्त झाले. त्यावेळचे रामटेक पोलीस

८२
विश्व वनवासींचे