पान:विश्व वनवासींचे.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

श्री. केशवराव देशपांडे अमरावतीला शासनामध्ये कर्मचारी होते देशपांडे यांचे घराणे हे मुळच्या वर्धा जिल्ह्यातील 'आर्वी' तहसीलमधील आहे. श्री. केशवराव देशपांडे यांचे वडील श्री. खंडेराव यांच्या साधू प्रकृतीमुळे त्यांचे श्रम-संपत्तीकडे व शेतीकडे ध्यान नसायचे. त्यांनी आर्वीचे सिद्धपुरुष अप्पा महाराजांनी दीक्षा (उपदेश) दिली होती.

 रूढी-परंपरेने आध्यात्मिक व तपस्वी जीवनाने त्यांच्या मुलांना सुयश प्राप्त झाले. श्री. बाळासाहेब यांना आध्यात्मिक तपस्वी जीवन प्राप्त झाले होते. श्री. बाळासाहेबांची आई श्रीमती लक्ष्मीबाई ही देवरस कुटुंबातली होती.

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक श्री. बाळासाहेब देवरस श्री. बाळासाहेब देशपांडे यांचे मामेभाऊ होते. श्री. बाळासाहेबांचे दोन मोठे भाऊ श्री. श्रीधरराव आणि श्री. प्रभाकरराव हे होत. परिवार मोठा होता. चारही भाऊ वकिलीची परीक्षा पास होते. श्री. श्रीधर उपाख्य श्री. अण्णाजी देशपांडे हे नागपूरचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. श्री. नीलकंठराव सावनेरमध्ये वकिली करीत होते. छोटे भाऊ श्री. प्रभाकरराव शासकीय नोकरी करीत होते. श्री. बाळासाहेब जीवनभर एक सामाजिक कार्यकर्ताच राहिले. वनवासी समाजासाठी वकिली त्यांची हितरक्षा करण्याचा त्यांचा ठाम हेतू होता. त्यासाठी आपले जीवन त्यांनी अर्पण केले होते.

 श्री. बाळासाहेबांचे प्राथमिक शिक्षण अमरावती, अकोला नरसिंहपूर येथे झाले. वडिलांनी नागपूरला कायम निवास केला. तसे श्री. बाळासाहेबानी काशी हिंदू विद्यापीठाची माध्यमिक (मॅट्रीक) परीक्षा पास केली. श्री. बाळासाहेब यांचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवारांशी १९२६ला झाला. ज्यावेळेस ते आपल्या मोठ्या भावाबरोबर नागपूरला शिक्षण घेत होते. त्या दिवसांमधी ते वॉकररोड या ठिकाणी व्यायाम शाळेत लाठी-काठी शिकायला जात होते. त्यावेळेस त्यांच' कृष्णराव जोशी यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी बाळासाहेबांचा परिचय डॉ. श्री. हेडगेवार यांच्याशी करून दिला. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या संपर्कात येताच ते संघाने स्वयंसेवक बनले.

बाळासाहेब देशपांडे

८१