पान:विश्व वनवासींचे.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वनवासी कार्यासाठी वेळ द्यावा, असे कार्यकर्ते जोडून गंगोत्रीचा प्रवाह रुंदविला.

देशकार्य हेच देवकार्य

 स्व. बाळासाहेब देशपांडे यांनी देशपूजा हीच देवपूजा मानून वनवासी समाजाचे दुःख, दारिद्र्य, अनारोग्य, अज्ञान दूर केले. अद्यापही हे कार्य अधिक जोमाने लाखोंच्या संख्येतील कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे. बाळासाहेबांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. लहानपणी डॉ. हेडगेवार यांची प्रेरणा त्यांना लाभली होती. पुढे गुरुजींनी प्रत्यक्ष दिशा दाखविली. पुढे १९४२च्या आंदोलनातील तुरुंगवासानंतर १९४८ मध्ये मध्यप्रदेश शासनाने वनवासी बांधवांसाठी त्यांच्या उन्नतीचे कार्य बाळासाहेबांवर सोपविले. ते त्यांनी स्वत: यशस्वी करून दाखविले. एका वर्षात १०० शाळा वनवासी भागात सुरू केल्या. १९५२च्या २६ डिसेंबरपासून सुरू केलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याचा व्याप वाढविला-विकास केला.

 आज देशभरात ३२ विश्वस्त संस्था असून १२५०० स्थानांमधून १७७७० सेवा प्रकल्प सुरू आहेत. एकूण ३३८ वनवासी जिल्ह्यांत हे काम होत आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी १८१ छात्रावास आणि विद्यार्थिनींसाठी ४४ वसतिगृहे चालविली जातात. त्यामधून देशभरातील हजारो विद्यार्थी शिक्षण आणि सुसंस्कार घेत आहेत. ही संख्या ८००० हून अधिक आहे. वनवासी भागातील युवकांना प्राथमिक वैद्यकीय शिक्षण देऊन २७०० हून अधिक आरोग्य रक्षक तयार केले. ३१४ आरोग्य केंद्रे, ४ रुग्णालये आणि अक्षरश: हजारो वैद्यकीय चिकित्सा शिबिरातून १५ लाखांवर वनवासींनी आरोग्यसेवेचा लाभ घेतला. या कार्यातून सुशिक्षित वनवासी सुसंस्कारीतही झाला. वनवासी बांधवांना आरोग्य रक्षण करता आले. श्रद्धाजागरण व हितरक्षेतून अराष्ट्रीय कारवायांना, धर्मांतराला मतांतराला आळा बसला. क्रीडा विभागात वनवासी बांधव चमकू लागले. महिलांना स्वावलंबी होता आले.

वनयोगी बाळासाहेब यांचा जीवनालेख

 श्री. बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१३ला अमरावतीच्या एका मध्यम वर्गीय परिवारामध्ये झाला. त्यांचे वडील

८०
विश्व वनवासींचे