पान:विश्व वनवासींचे.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कार्याची आज स्थितीगती आहे. 'परम वैभवनेतुम एतत् स्वराष्ट्रम्'। ही दृढभावना या कार्याच्या मुळाशी होती म्हणूनच हे शक्य झाले. अदम्य आत्मविश्वासाने आणि 'नर सेवा हीच नारायण सेवा' मानून त्यांनी अहोरात्र ध्यास घेऊन वनवासींची उन्नती साधली. राष्ट्र उभारणीच्या कार्यात भारतीय हिंदू संस्कृतीचे अविभाज्य, अभिन्न अंग असलेल्या वनवासींनाही योगदान देता यावे म्हणून त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचे व्रत बाळासाहेबांनी अंगिकारले होते.

फळे रसाळ गोमटी

 'शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी' असे विशुद्ध हेतूने बाळासाहेबांनी सुरू केलेले कार्य असल्याने त्याला आता रसाळ, गोड चांगली फळे लागत असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रापुरता विचार केला तरी वनवासींचे जीवनमान आणि राहणीमान आता बदललेले दिसते. अक्षरश: हजारो सुशिक्षित, सुसंस्कारित आणि सुप्रतिष्ठित युवकांची पिढी तयार झाली आहे. वनवासींमध्ये आता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक, लोकसेवा आयोग, केंद्रीय सेवा आयोग, मंत्रालय, या माध्यमातून सुपर क्लासवन अशा विविध पदांवर वनवासी युवक आपल्या तेजाने तळपू लागले आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांचा नावलौकिक सतत वाढत आहे. ऑलिंपिकही त्यांना आता दूर नाही. वनवासी कल्याण आश्रमातून घडलेल्या युवकांच्यामध्ये आपणच आता आपल्या समाजाचा, स्वत:चा विकास साधला पाहिजे हे तत्त्व उमगले आहे. भगवद्गीतेत 'उद्धरेत आत्मना आत्मानं । न आत्मानं अवसा येत ।' 'उद्धार करावा आपला आपणच, स्वत:ला कधी कमी लेखू नये' असे म्हटल्याप्रमाणे आता वनवासी बांधवांना उमजले आहे. या दिशेने वनवासींची वाटचाल चालू झाली आहे. आपल्या वनवासी कार्यकर्त्यांना त्यांचे सांगणे होते, की 'मी तुमचा आहे' या भावनेने वनवासी क्षेत्रात काम करावे, मग तुम्हालाही वनवासी, त्यांचे म्हणून अवश्य स्वीकारतील. त्यांची सादरी बोलीभाषा आत्मसात करून त्यांच्यातले एक व्हावे, हे बाळासाहेबांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. आपले तन-मनधन त्यांनी तर अर्पण केलेच; पण त्यांच्यात आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि स्वावलंबन निर्माण केले. कार्यकर्त्यांनी ३६५ दिवसांतून जरूर

बाळासाहेब देशपांडे

७९