पान:विश्व वनवासींचे.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वेगवेळ्या वेळी हे लेखन झाल्यामुळे काही लेखात पुनरुक्ती करावी लागलेली आहे.

 महाराष्ट्र शासन शिक्षण संस्था आणि बालभारती यांच्या मार्गदर्शनाने संशोधन-संकल्प पूर्तीसाठी, त्यांचे आभार मानतो. ठाणे व नाशिक जिल्ह्यातील वनवासी क्षेत्रात माझे वास्तव्य आणि वावर जाणून श्री. सुरेशराव कुलकर्णी (पंढरपूर) यांनी वनवासी कल्याण प्रांताच्या कामाशी आग्रहाने मला जोडले, त्याचे हे फलित मी मानतो.

 शिवाय प्रकाशक, मुद्रक, मुखपृष्ठ, अक्षर जुळणी, यांचाही मी आभारी आहे. विशेषत: भारतीय विचारसाधना यांनी प्रकाशनार्थ हा ग्रंथ स्वीकारला हा मी माझ्यावरील अनुग्रह मानतो.

 या ग्रंथावर अभिप्राय देणाऱ्या आदरणीय यशवंतराव लेले या मान्यवरां विषयीची कृतज्ञता व्यक्त करतो.

 हा ग्रंथ सिद्ध करीत असताना, वनवासींबद्दल विशेष आस्था बाळगणारी माझी धाकटी बहिण "स्मिता लीलाधर निजामपूरकर" हिचे दु:खद निधन झाले, तिला आणि वनवासी क्षेत्रात जीवाचे रान करून सतत कार्यमग्न असणाऱ्या नगरवासी-वनवासी कार्यकर्त्यांना हा ग्रंथ मी अर्पण करतो. वनयोगी बाळासाहेब देशपांडे जयंती २६ डिसेंबर, २०१७ला नुकतीच साजरी झाली आहे त्याचे हे स्मरण.


- भास्कर गिरधारी.

चलभाष : ९८२३०१२३०१

bvgirdhari@gmail.com

१ जानेवारी, २०१८
***

विश्व वनवासींचे