पान:विश्व वनवासींचे.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काम स्वयंसेवी संस्थांनी आणि स्वयंसेवकांच्या जथ्यानीच होऊ शकते. हा अनुभव येतो. आजही निम्मी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली दिसते. अन्यथा ती दिसली नसती.

 वनवासी समाज पुरता संघटित नाही. त्यात कमालीचा न्यूनगंड आहे. त्याला ढळढळीत धर्मविहीन ठरविण्याचा बळेबळे प्रयत्न होतो. त्याच्या जीवनात असंख्य समस्या आहेत. हे सारे दूर करण्यासाठी मानसिक, बौद्धिक आणि क्रियाशिलतेच्या पातळीवर विविध कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहेत. वनवासी समाज बुद्धिमान आणि सद्गुणी आहे. त्याला योग्य संधी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या समाजसेवकांनी मनापासून केला. एकसंध समाज घडविण्याचा, वनवासींच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांनी प्रयत्न केला त्यांची ही नामावली कार्याची जाणीव करून देणारी आहे.

 ठक्करबाप्पा, आचार्य भिसे गुरूजी, बाळासाहेब देशपांडे, मोरूभाऊ केतकर, गोदुताई परूळेकर भास्करराव कळंबी, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, शिवाजीराव पटवर्धन, माधवरावजी काणे, दादासाहेब बीडकर, बाळासाहेब दीक्षित, गंगाराम आवारी गुरूजी, रेवजीभाऊ चौधरी, आमदार भाई कडू, चिंतामण वनगा, विष्णू सावरा, अप्पाजी जोशी, लहानू कोम, नवसू दळवी, वसंतराव साठे इत्यादी अनेक कार्यकर्त्यांची कृतज्ञतापूर्वक दखल घेणे उचित ठरेल.

***
७६
विश्व वनवासोच