पान:विश्व वनवासींचे.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देशपांडे. गुरुजींच्या सांगण्यावरूनच त्यानी वनवासी कल्याण कार्याची भक्कम उभारणी केली. विकासाच्या वाटेला डोळे लागलेला हा वनवासी त्याला गुरुजींच्या प्रेरणेने असंख्य कार्यकर्त्यांनी प्रेमाने, आत्मीयतेने प्रतिसाद दिला. ते वनवासींना सहाय्यभूत झाले. ही यादी मोठी आहे. त्याखेरीज समाजवादी, साम्यवादी विचारांनी भारलेले बाबा आमटे, शिवाजीराव पटवर्धन, गोदावरी परूळेकर यांचेही वनवासी विकासाचे कार्य लक्षवेधी आहे.

'दया' नव्हे तर 'सेवा'

 वनवासी बांधवांची कीव येऊन दया बुद्धीने हे काम झालेले नाही तर सेवा भाव मनात वागवून कार्य केलेले हे कार्यकर्ते आहेत. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हा सेवा भाव आहे. उपकाराची जाणीव येथे नाही. 'बहुजन सुखाय-हिताय' हे कार्य झालेले आहे. जनजातींच्या उत्थानासाठी विविध सेवा प्रकल्प त्यांनी राबविले आहेत. या सेवा प्रकल्पांच्या माध्यमातून अनेक सक्षम कार्यकर्ते घडले. आजही ते आपापल्या परीने परिश्रम-प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. वनवासी मुला-मुलींचे छात्रावास, वनवासींना उत्तम शिक्षण आणि भारतीयत्वाचे सुसंस्कार घडविणे, धर्मार्थ दवाखाने, आरोग्यरक्षक आणि चिकित्सालये, खेलकूद या क्रीडापटूंना घडविण्यासाठी प्रकल्प संवर्धन, ग्रामसभा, महिला बचतगट, स्वयंरोजगार क्षेत्र, वनवासी मेळावे, कार्यशाळासंमेलने इ. या बहु आयामी क्षेत्रात वनवासी क्षेत्रातील कार्यकर्ते वनवासींचा स्वाभिमान जागविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना स्वावलंबन शिकवीत आहेत.

अ- सरकारी कामच खरे, असर कारी

 चित्रकूटचे शिल्पकार समाजशिल्पी नानाजी देशमुखांनी, गोळवलकर गुरूजींनी, अशा हाडाच्या समाज सेवकांनी एकमुखाने हे मान्यच केले आहे, की शासन सरकारवर अवलंबून राहून कधी कार्य पुढे जात नाही तर प्रभावी कार्य हे समाजाच्या, जन सामान्यांच्या सहकार्यातून खरे उभे राहते. म्हणूनच असर कारी म्हणजे परिणामकारक

वनवासी समाज विकासक

७५