पान:विश्व वनवासींचे.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १९/२० व्या शतकात १५० वर्षे ब्रिटिशांनी आपली अधिकारशाही “फोडा व झोडा' या घातक प्रश्नांची जुलमी राजवट लादली. त्याकाळात वनवासी बांधवांच्या शोषणाला सुरुवात झाली. विशेषत: आपल्या महाराष्ट्रातील लघु उद्योग, हस्तकला आणि ग्रामोद्योग व्यवसाय यांना उतरती कळा लागली. ग्रामीण, अतिग्रामीण भागातील, खेड्या पाड्यातील जनता त्यामुळे दरिद्रीच राहिली. दारिद्र्याबरोबरच बेकारी विषमता, बेरोजगारी यांनी ती ग्रासली.

वनवासींच्या उत्थानाचा वसा

 अशा या गोरगरीब वनवासी जमातींच्या विकासाचे, उत्थानाचे काम होणे अगत्याचे होते. त्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या वनयोगींनी (हाच शब्द चपखल वाटतो) कल्पनातीत खस्ता खाल्ल्या, त्यातही ज्ञात थोडे, अज्ञात फार आहेत. 'असू पत्थर आम्ही पायातील' हे वचन सार्थ करणारेच अधिक आहेत. वनवासी समाजाच्या जडण-घडणीत या कर्मयोग्यांचा सहभाग इंग्रजी आमदानीपासूनच चालू राहिला. महाराष्ट्राच्या अति दुर्गम, डोंगराळ भागात या वनयोग्यांची खडतर तप:साधना झालेली आहे. वनवासी बांधवांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी ही तपश्चर्या काही प्रमाणात कारणी लागली आहे. त्यामुळे वनवासींचे जीवन सुखकर (निदान काही प्रमाणात) होऊ शकले. त्यांना स्थैर्य लाभले. वनवासी क्षेत्रातील, कर्मयोग्यांची महाराष्ट्र समाज घडणीत नोंद होणे तेवढेच गरजेचे आहे.

महात्मा गांधी-गोळवलकर गुरूजींची प्रेरणा

 महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन ठक्करबाप्पा, आचार्य भिसे गुरुजींसारखे वनवासी क्षेत्रात कार्य करू लागले. यात प्रि.टि.ए. कुलकर्णी यांच्या शैक्षणिक कार्यातही या जाणीवेचा आणि प्रेरणेचा प्रत्यय येतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक बेलूरमठाच्या स्वामी अखंडानंदांचे शिष्य मा.स.गोळवलकर गुरुजी यांना या समस्येची उत्तम ओळख आणि पारख होती. त्यांच्या प्रेरणेने वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना झाली. आद्य संस्थापक होते श्री. बाळासाहेब

७४
विश्व वनवासींचे