पान:विश्व वनवासींचे.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही व्यापक, वैश्विक, मानवतावादी हिंदुत्वाची सुलक्षणे आहेत. स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला हिंदू धर्म, महात्मा गांधींचा अध्यात्मनिष्ठ हिंदू धर्म, साने गुरुजींची भारतीय संस्कृती, राष्ट्र आणि संस्कृती सूचक हिंदू धर्म तो हाच आहे. पांडुरंगशास्त्री आठवले यांनी याच विशाल हिंदूधर्माचे प्रतिपादन केले. सगळ्याच नद्या शेवटी सागराला मिळतात तसे जगन्नियंता परमेश्वराकडे अंतीमत: ही धाव आहे. वनवासी बांधवांच्या भाषेत हाच ‘महादेव, शिव, ‘डोंगऱ्या देव' म्हणून फारतर ओळखला जात असतो. डोंगराच्या गाभाऱ्यातील महादेवाचे हे 'डोंगऱ्या' नामकरण आपण समजून घेतले तरच एकात्म भावनेची जाणीव होईल. वनवासी लोकांशी एकरुप समरस होऊनच हा बोध होईल. वनवासींच्या चालीरीती, प्रथा, रुढी, तथाकथित श्रद्धा-अंधश्रद्धा अभ्यासूनही आपण याच निष्कर्षाप्रत येतो की, वनवासी हा आमचाच हिंदू बांधव आहे. त्याला अहिंदू ठरविणे अयोग्य आहे. वनवासी संस्कृती विशेष म्हणून कै. गंगाराम आवारी गुरुजी यांनी वेळोवेळी केलेल्या नोंदी या संदर्भात महत्त्वाच्या आहेत. त्या संदर्भातील एक महत्त्वाची नोंद म्हणजे वनवासींच्या विवाह संस्कारात विवाहापूर्वी गायले जाणारे गाणे ते 'ढवळ गाणे' व गाणारी 'ढवळी' स्त्री असते. 'ध' ऐवजी 'ढ' वापरला जातो. बोलीतील हे अपभ्रष्ट रूप आहे. वनवासींची मूळ समजूत अशी आहे की, या जगात सर्वप्रथम महादेव-पार्वतीचे लग्न 'धवल गिरी' पर्वतावर झाले. त्यावेळी जे गाणे म्हटले गेले ती ही प्रथा 'शिव-पार्वती'शी थेट नाते सांगणारी आहे.

'वनवासी' संज्ञा संदर्भात

 भारतीय राज्य घटना १९५० साली तयार झाली. त्यात १६ वा भाग हा सवलतींचा आहे. त्यातील प्रारंभीच्या ३३०व्या कलमात सवलतदारांचे वर्ग दिले आहेत. त्यात अनुसूचित जमातींचा समावेश आहे. राज्यपालांच्या सल्ल्याने राष्ट्राध्यक्ष ही यादी जाहीर करतात. त्यात वर्गीकृत (sheduled) भटक्या अथवा अनुसूचित जमातींना, रानटी-डोंगरी टोळ्या, आदिवासी, वनवासी, वन्य जाती जमाती

वनवासींच्या पाऊलखुणा

७१