पान:विश्व वनवासींचे.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काढणे, बांबूकाम, चटया, टोपल्या, चित्रकला, हस्तकला, भरतकाम, भांड्यावरील नक्षीकाम यात त्यांची सौदर्यदृष्टी प्रगट झाली आहे. निसर्गाचे ऋण मानून वनवासींनी त्यातून प्रेरणा घेऊन निरागस सौंदर्यदृष्टी जोपासली आहे.

 लोकसाहित्याच्या आविष्कारात म्हणींना महत्त्व आहे.

 'फडके घे मडके घे सूट' या म्हणीत मर्यादित गरजांचा निर्देश आहे.

 

'वाघ्याची माय दूधभात खाय'
  'खाशील तर खाय । नाहीतर उपाशी राहाय ।।'
  'कणगीत दाणा त भील उताणा'
 'बोलायला फुटाणा अन् काम काही रेटाना'
  'निलाजऱ्या दिला पिढा त म्हणे बसाया दिला'
  'बोलून बोलून सारी, माझं नव पारी'
  'लाज मरे तो भुके मरे'

 वनवासी संस्कृतीत रामायण रुजलेले आहे, हे पुढील गीतातून उलगडते,

 

'सीता गेली वारुळे तळेला सोनु कंबळायला ।
  हाक मारिते दशरथाला गं तिच्या सासऱ्याला ।
  हाक मारिते कौसल्याला गं तिच्या सासूला ।
  हाक मारिते मारिते लक्ष्युमणाला गं तिच्या दिराला ।
  हाक मारिते रामरायाला गं तिच्या नवऱ्याला ।।'

 माहेरवाशीण सासरी जाते तेव्हा ती व्याकुळ होते. तिला आपले घर आणि नातीगोती आठवतात. त्यावेळी पुढील गीतातून मौलिक उपदेश केला आहे.

  '

सासरच्या घरी गं बाई मी, बाबा कुणाला म्हणू ।
  म्हण गं म्हण गं लेकी, तुझ्याच गं सासऱ्याला ।।
  'सासरच्या घरी गं बाई मी, आई कुणाला म्हणू ।
  म्हण गं म्हण गं लेकी, तुझ्याच गं सासूला ।।

  महादेव कोळी समाजातील लोकगीतात 'नाशिकचे गाणे'

५६
विश्व वनवासींचे