पान:विश्व वनवासींचे.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाशिक : वनवासींचे
लोकसाहित्य

 नाशिक जिल्ह्यातील वनवासी लोकसाहित्याचे विशेष नोंदवीत असताना या लोकसाहित्यातही विपुल अक्षरधन लोकसाहित्याच्या सर्वच प्रकारांमध्ये आढळते. मौखिक परंपरा म्हणूनच हा वारसा आजतागायत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे, त्यात दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, हरसूल या सर्वच तालुक्यांचा आणि परिसराचा वाटा फार मोठा आहे.

 लोकगीते, लोककथा, उखाणे, म्हणी, कोडी, लोकसंवाद विविधस्वरूपी लोकविद्या, यातुविद्या, चित्रकला, लोककला, लोकवाद्ये इत्यादींचा समावेश त्यात आहे. लोकसाहित्याचे हे सारे रचनाप्रकार प्रभावी तर आहेतच पण त्यात लवचिकताही आहे. पांगूळ, वासुदेव, गोंधळी, भराडी, वाघ्या-मुरळी, भांड, बहुरूपी यांनी या परंपरा आजतागायत खेडोपाडी टिकवून लोकसंस्कृतीचे खऱ्या अर्थाने जतन केले आहे. कोकणा, भिल्ल, महादेव कोळी, धनगर, वंजारी, बंजारा या समाजाने कृषिसंस्कृती, विवाह, सणवार, विधी नाशिक संस्कृतीला जोडून आपल्या लोकवाङ्मयात जतन केलेले आहे. त्याची नमुन्यादाखल उदाहरणे आवर्जून नमूद करावीत अशीच आहेत. अहिराणी प्रमाणेच भिल्ली, कोकणी, धनगरी, दखनी, गुजराथी, प्रमाण मराठीच्या प्रभावाखालील मराठी बोली भाषिक विचारात अंतर्भूत आहेत.

 नाशिकच्या परंपरेतील लोकवाद्ये विविध प्रकारची आणि अत्यंत कमी खर्चात तयार व्हावीत अशीच आहेत. एकतारी-चिपळी, ढाक, घांगरी, भांगसर भाळ, हलगी, तुतारी, डफ, ढोल, पायसरी, पखवाज, टाळ, ढोलताशा, संबळ, दिमडी, तारपा, तुणतुणे, पुंगी, भीलसाई अशी ही लोकवाद्ये वापरात आहेत.

 वनवासी लोकसाहित्याचे भाषिक विशेष पाहता अत्यंत उत्तम व सुलभ शब्दसंपत्ती मराठीला समृद्ध करणारी आहे. पूर्व दिशेला

५४
विश्व वनवासींचे