पान:विश्व वनवासींचे.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सीता त्याला शाप देते 'जळो तुझी जमीन'. पण मग आपली चूक कबूल करून हा वनवासी उ:शाप मागतो तेव्हा सीतामाई प्रसन्न होऊन त्याला उ:शाप देते 'जळो पण पिको' म्हणजे तू जमीन जाळतो पण ती चांगली पिकत जाईल. ती प्रथा चालू आहे. त्याला कृषी संशोधनाचाही आधार आहे. वनवासी झाड तोडीत नाही, वाढवतात कारण 'झाड तठ वारा' 'पडती पाण्याच्या धारा' अशी म्हण रूढ आहे. हिरवा देव, जांभूळपाडा, नीळमाती, मेट म्हणजे घोडे बांधतात ती 'पागा', जांबसर, पिंपळगाव, डोंगरगाव या नावात झाड, डोंगर, मातीचे प्रेम अभिव्यक्त झालेले आहे. 'कवळी भाजी' चा सण सगळे मिळून नवीन भाजी समारंभपूर्वक 'सिलेब्रेट' करून खातात. 'होळी जळाली, थंडी पळाली', 'तण खाई धन' या म्हणीत पिकांची निगा राखली जावी ही कल्पना आहे. 'वावरात पिकू दे, आमचे पोट भरू दे' 'माय माझी तू, घरात सोन पडू दे'.

 ‘फडका घे मडका घे....सूट' एवढ्याच काटकसरीत वनवासी राहतो. 'जेढ अन् पाण्याची भेट', 'पुस करी हुस', 'पडतील स्वाती तर पिकतील मोती.'

 'चैत म्हणजे दैत', 'पडल्यानाही मघा तर वरती बघा' अशा अनेक म्हणी पर्यावरणाशी संबद्ध आहेत. असे हे वनवासींचे पर्यावरणाचे भान आहे. ही वनवासींची पर्यावरणाची जाण, पर्यावरण रक्षण करते ही वस्तुस्थिती आहे.

***
वनवासींची पर्यावरण जाण

५३