पान:विश्व वनवासींचे.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि ऋण फेडून मुलीला घेऊन स्वत:चा संसार थाटतो. अशा या प्रथा आहेत. त्या परमार्थाने समजून घेतल्या पाहिजेत.

मर्यादित खर्चात अमर्याद आनंद

 गव्हाची पोळी हे वनवासींचे सणाचे पक्वान्न आहे. फार तर भाताबरोबर गूळ भरून कणकीची उकडलेली 'उंडी' यावर सणवार आणि पाहुणे पाहुणचार साजरा होतो. एरव्ही नागलीची भाकरी आणि मडक्यात शिजवलेले उडीदाचे वरण हेच त्यांचे खाणे असते. भातशेती पिकली तर भात!

 तारपा, ढोलनाच, मांदोळनाच, थाळगान, दंडार, बोहाडा, जागरण, गोंधळ, सोंग, मुखवडे खेळ तरीही साजरे होतातच अमर्याद आनंदातच मात्र मर्यादित खर्चात.

पर्यावरण जाणिवेची झलक

 चोरी नाही, भीक नाही, गैरवर्तणूक नाही असा हा आपला वनवासी समाज पर्यावरणाची मूळातच जाणीव ठेवून जपवणूक करणारा आहे. याचे सोपे उदाहरण म्हणजे झोपडी बांधताना प्रथम आपल्या गुराढोरांची जागा घरात निश्चित करतात; मग उरलेल्या जागेत स्वत:चे घर बांधतात; असा हा पशुधनाबद्दलचा कळवळा आहे. स्वत: कोरा चहा पितात कारण दूधावर वासरांचा हक्क आहे; माणसाचा नाही ही जाणीव आहे. नाचतानाही आधी धरणी मातेला वंदन करतात. कारण धरतीमाता आहे. नाचताना तिच्यावर पाय ठेवावा लागतो. तिला पाय लागतो म्हणून नाचामध्ये भूमी मातेला त्यांचे पहिले नमन असते. म्हणजे मातीचे मोल ते जाणतात. “काळी-आई' जपतात. जनावर सांभाळतात. वृक्ष, वनराई तर त्यांच्या उपजिविकेचे साधन आहे. या वनराजाला या वनोपजावर निर्भर राहावे लागते. केवळ झाडाची राब तोडून जमीन जाळून पिकवितात त्यामध्ये कृषिशास्त्रही दुजोरा देते. 'जळो पण पिको' त्यामुळे अधिक पीक यायला मदत होते.

रावण पळवितो ती सीतामाई कथा

 रावण सीतेला पळवून नेत असताना तिला वनवासींनी सोडविले नाही. तो त्याची राब जाळण्यासाठी पाने तोडण्यात गर्क असतो म्हणून

५२
विश्व वनवासींचे