पान:विश्व वनवासींचे.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अथ नाचू का कोठ कोठ नाचू

  कणसरी माझी मायूर

 तिला मी पाय कसा लावू रं'

 असे हे वारल्यांचे उत्कट धरणीमातेबद्दलचे प्रेम केवळ अजोड असे आहे. या वारली समाजाबद्दल ते अडाणी आहेत, अंधश्रद्धाळू आहेत असे अपसमजही पसरलेले आहेत. पण यातील तथ्य जीवन मूल्यांच्या संदर्भात समजून घ्यावे लागेल. 'वारली' शब्दाची वि.का. राजवाडे यांनी वरूडाई > वारुली > अशी व्युत्पत्ती सांगितलेली आहे. तर कात्यायनाने वार्तिकात निषाद, व्यास आणि वरूड या तीन जमातींचा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे डॉ. विल्सन यांनी 'वारली, शब्दाची व्युत्पत्ती सांगताना नमूद केले आहे, की दक्षिणेतील सात कोकणांपैकी 'वरलाट' कोकणात राहातात ते 'वारली' होय.

 पण या व्युत्पत्तीवर एकमत होईलच असे नाही. मात्र वारली लोकगीतात मांडलेले तत्त्वज्ञान स्वीकारार्ह अंतर्मुख करणारे आहे. त्यातून त्यांच्या जीवनमान, राहणीमान यापेक्षा उदात्त विचारसरणीवर अधिक प्रकाश पडतो त्याचे उदाहरण पहा-

  'कच्च्या घड्याचा दाटू काहितरी

 कायेचा दादू, नाही काही दिस' म्हणजे माणूस एखाद्या कच्च्या घड्यासारखा आहे. थोड्या काळाचा तो सोबती, पण नश्वर आहे. पण आहे तोवर कौटुम्बिक जीवनातील आनंद, नात्यातील उदात्त भावनांसह व्यक्त करतो.

 'माझा गो जावाय

 पुनवेचा चांदू ग

 माझी ग सूनस

  दारची तुळस ।।'

 आता वारली समाजातील मंत्रातंत्रावरील विश्वासाचे उदाहरण नमुन्या दाखल पाहावे. एखाद्याला जखम झाली तर वाहणारे रक्त बंद होण्यासाठी अथवा जखम भरून निघण्यासाठी पुढील मंत्र आहे तो 'सीताराम इंपाळ'कडून प्राप्त झाला आहे. कोरा कागद घेऊन पाहणी

४४
विश्व वनवासींचे