पान:विश्व वनवासींचे.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करताना किनऱ्या आवाजात म्हटली जातात.

लोकनृत्याचा मनसोक्त आविष्कार

 भारतीय जनजातींचा सदैव सामूहिक, सामुदायिक सगळ्यांचा मिळून एकत्रित असाच कलाविष्कार असतो. सामूहिक भावनेला जपणारा हा समाज आणि एकंदरच या जनजातीची उदात्त संस्कृती आहे.

 नाच-गाणे लोकगीत सदोदित गुणगुणणे ही जणू या जनजातीची जीवनशैलीच होऊन बसली आहे. मांदळ, बोहडा, ढोलनाच, तारपानाच यासारख्या लोकनृत्याचा मनसोक्त मुक्त आविष्कार या जनजातींच्या जीवनात अनुभवता येतो. जनजातीचा जीवनातील हा आनंदाचा ठेवा आहे. विरंगुळा आहे.

 वनवासींची ही लोकनृत्यकला म्हणजे लोकनृत्य वैभव आहे. नृत्यकलेचा हा समृद्ध भारतीय वारसा चालत आलेला आहे. भारतीय जनजातीची ही मांदळ सारखी लोकनृत्ये निसर्गाशी सुसंवाद साधतात. त्यांची लय, ताल, ठेका, वाद्यसंगीत, नि:संकोच मुक्त नृत्य, कसरत, चमत्कृती, संवाद, सोंग, वाघ, सिंह, मोर अशा पशूपक्षांची वेषभूषा रंगभूषा सारेच अपूर्व आहे. सगळ्यांना सामावून घेऊन त्यांचा सहभाग वाढविणारे आहे. तरुण, बाल, वृद्ध सगळे या नृत्यात गुंतून जातात. रंगात आलेल्या नृत्यात घोषणा, हुर्योऽऽ असे आवाज, चित्कार, आरोळ्या त्या नृत्याची लज्जत वाढविणारेच असतात.

 लोकनृत्याला पूरक अशी लोकगीतेही ठरतात! तात्पर्य, वनवासींच्या या पारंपारिक लोककला नृत्याच्या कलात्मक आविष्काराचा, लोकनृत्य शैलीचा शास्त्रीय अभ्यास झाल्यास या नृत्यकला सुविकसित होतील.


***




वनवासींचा मांदोळ नाच

४१