पान:विश्व वनवासींचे.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गिरीजन राहणार नसून तो ग्रामीण जीवनात सामावला आहे. नागरी जीवनाकडे त्याची वाटचाल आहे. सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ पाहतो आहे. त्यामुळे हा वनवासी लोकनृत्य कलेचा ठेवा कसा जतन केला जाईल? आणि त्याचे संवर्धन कसे होईल? याची काळजी आहे. तथापि वनवासी समाजांची प्रगती अवश्य व्हावी, पण त्यांच्यात संस्काराला, परंपरेला जे प्राधान्य आहे; त्यानुसार त्यांना ती जतन करावीशी वाटेल, तिचे ते संवर्धन करतील अशी अपेक्षा आहे.

 नोकरी - मजुरीनिमित्त जरी ते आपापल्या पाड्यापासून दूर असले तरी कोणत्याही परिस्थितीत शिमग्याला ते नफा-नुकसानीचा विचार न करता हमखास पाड्यावर गावाकडे मोकळं नाचण्यासाठी, हुंदडण्यासाठी परततातच.

 वनवासी जीवनातील या लोकनृत्य कलेचे, तिच्या उच्च दर्जाचे स्थान अबाधित राहण्यासाठी कलासंवर्धनासाठी 'सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. उदा. महोत्सव, लोकनृत्य सभागृह, वाद्य साज सामग्रीची उपलब्धी इ.

 वनवासींच्या जीवनातील लोक संगीत-नृत्य हरपले तर ते जीवन निरानंद-भकास होईल. उलट त्यांच्या या लोकनृत्यकलेला संशोधनपूर्वक शास्त्रीय अभ्यासाची जोड लाभल्यास ही कला विकसित होईल. वनवासींच्या आनंदाची परिसीमा ही लोकनृत्यकला आहे.

संदर्भ :

१. भारतीय संस्कृति कोश (प्रथम खंड),

 संपादक : महदेवशास्त्री जोशी द्वि. आ. १९८२.

२. विश्वकोश खंड १ व २ प्रमुख संपादक : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.

३. आदिवासी कला : डॉ. गोविंद गारे व उत्तमराव सोनावणे, ग.म.भ.न. प्रकाशन पुणे प.आ. १९९३.

४. आदिवासी लोकरंगभूमी : डॉ. सुदाम जाधव, सुलबा प्रकाशन, औरंगाबाद २००४.

५. आदिवासी स्त्रियांचे भावविश्व : सौ. सुमन मुठे, कीर्ती प्रकाशन, औरंगाबाद, २००६.

६. आरसा : आदिवासी जीवनशैलीचा : डॉ. भास्कर गिरीधारी, युगांतर प्रकाशन, नाशिक दु. आ. २००४.

***
वनवासी लोकनृत्य

३७