पान:विश्व वनवासींचे.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जल्लोष वाढविणारी असते. नृत्याला पूरक असते. अनेकदा नृत्यगीतांचा आशय हा प्रत्यक्ष सादरीकरणातून त्यावेळच्या अभिनयातून अभिव्यक्त केला जातो.

"किल्ल्याना भिल्लनी, खेळ करनी ।
आम्ही डोळाम, काजळ घालनासी ।।१।।
आम्ही डोळा, मोडी मोडी नाचनारनी ।
आम्ही नाक म नथ घालणानारनी ।।२।।'

 अशी ही लोकगीतातील शब्दांची ठेवण, त्यांची लय आणि नर्तकांचे कायिक हावभाव यातून ते संपूर्ण नृत्याचे दृश्य सादर होते. बारश्याच्या प्रसंगीही असेच नाचत मुलाच्या घरी गाणे म्हणतात. नृत्यगानाचा आनंद लुटतात.{{paragraph break}

'वरखडीत जावानी गाडी सजणे, शंकर देवानी
पार्वती नटनी लक्ष्म्या आईने पूजा थोपनी ।
शंकर देवानी पूजा थोपनी, धावत या कोणी
पळत या आईला गावात न्या ।।'

वनवासी लोकनृत्यातील विविधता

 वनवासींच्या एकेका लोकनृत्यात सुसंघटितपणा एकमेळ, एककृती, समान पदन्यास असले तरी त्याचे विविध प्रकार आहेत. त्यात वैचित्र्य आणि विविधता आहे. वनवासींमध्ये भावनिक एकजूट, एकात्मता निर्माण करणारी ही नृत्ये आहेत. त्यात चपळाई असते. जलद हालचाली असतात. पारंपरिक रुढींशी आणि विधींशी या नृत्याचा संबंध असतो. त्यात मनोरे, पिरॅमिडस्, व्यायामाचे प्रकार अनेक पद्धतींचे खेळ असतात. बैठकीचे खेळ असतात. स्पर्धा आणि चुरस असते. काही नृत्ये शक्ती सामर्थ्याची तर काही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ सुचविणारी असतात. कोडे घालून उलगडविणारी असतात. निसर्गाच्या सान्निध्यात ही नृत्ये असल्याने त्यात कोणत्याही प्रकारचा बंदिस्तपणा नसतो. वातावरण मुक्त असते. मने मोकळी असतात. पौर्णिमेची वा चांदणी रात्र असते. वेगळी कृत्रिम प्रकाश योजना करावी लागत नाही. वनवासींनीच तयार केलेल्या विविध वाद्यांच्या प्रतिसादात स्वाभाविकपणे ही नृत्ये

३४
विश्व वनवासींचे