पान:विश्व वनवासींचे.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
'होळी जळाली अन थंडी पळाली'
'काम ये ना मये अन घमेले येऊन पये
'सुकेतळ्याला पाखरे फडफडती' (उत्तर : लाह्या)
'आरवत कोंबडा तरंगत जाय....चारशिंग दहा पाय'
(उत्तर : नांगर, दोन बैल, नांगरधारी)
'काळी गाय काटे खाय....पाण्याला पाहून उभी राहाय'
(उत्तर : चप्पल/वहाण)
'
माही बीजा....कोंबजाशिजा
'
पोषापाषांनो...उगाच निजा'

यात शृंगार सूचनेची झलक आहे.

 घरौंदा म्हणजे घरजावई, मेढिगा - लग्न लावणारी स्त्री, गरोदर स्त्री म्हणजे 'दोनजीवी', गोडा दिवस म्हणजे सोमवार, मोडा दिवस म्हणजे मंगळवार, 'उगवती' म्हणजे पूर्व आणि मावळती म्हणजे पश्चिम दिशा अशी ही त्यांची सरळ, सोपी वस्तुस्थिती निदर्शक लोकभाषा आहे. लोकवास्तवाचा परिपोष करणारी आहे.

 अशा वनवासी लोकसाहित्याचे संवर्धन व्हावे, जतन व्हावे ही आजची आपली सांस्कृतिक गरज आहे. केवळ तोंडी, मौखिक स्वरूपात आजही अस्तित्त्वात असलेल्या या लोकसाहित्याचा आपल्या देशी समृद्ध परंपरेचे आपल्याला सुयोग्य भान येण्यासाठी, संशोधन, संकलन आणि विवेचक, चिकित्सक अभ्यास करून तो ग्रंथरूपात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

-महत्त्वाचे संदर्भ -

आदिवासी नाटक (लेख) डॉ. रमेश कुबल, मराठी मित्र, शिवळे, मार्च २००४.

प्राचीन मराठी वाङ्मयातील लोकतत्त्व : डॉ.सौ.अमिता मुजुमदार, सविता प्रकाशन,

औरंगाबाद, १९८८.

आरसा : आदिवासी जीवन शैलीचा, डॉ. भा.व्यं.गिरधारी, युगांतर प्रकाशन,

द्वितीय आवृत्ती,२००४.

महाराष्ट्र दर्शन दिनदर्शिका : महाराष्ट्रातील लोकवाद्ये, सविता शेलार,२००५.

***
वनवासी लोकसाहित्याचे स्वरूप
२९