पान:विश्व वनवासींचे.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या गीतात पुढे -

'नव महिने गर्भ जपिला
सूर्य मंत्रानी कर्ण हा आला
काळा कर्ण अवतरला
रे देवा काळा कर्ण अवतरला'

 यात कुंती आपले दुःख कृष्णाला सांगते कर्ण सूर्य मंत्राने नऊ महिने गर्भ जपून अवतरला, पण प्रेमाविना तो गंगेला अर्पण करावा लागला. सूर्याच्या प्रखर तेजापासून मात्र हा काळा कर्ण अवतरला ही अत्यंत सूचक कल्पना आहे.

लोकसाहित्याचे भाषिक विशेष

 काज' म्हणजे कामकाज यातले कार्य या अर्थाने आहे. 'काज' हा सामुदायिक श्राद्धविधी वनवासी विधुर आणि विधवा यांच्या कौटुंबिक पुनर्वसनासाठी विधी आहे. मृतात्म्यांना संतुष्ट करण्याबरोबरच कृषिसंस्कृतीची गरज म्हणून ते कौटुंबिक पुनर्संघटन-पुनर्वसन होत असावे.

 पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वनवासींची लोकभाषा लक्ष वेधून घेणारी आहे. उदाहरणार्थ -

'जेठ अन पाण्याची भेट'
'मादवा अन हांडी मडकी वाजवा'
'पुस करी हुस'
'चैत म्हणजे दैत'
'पडल उतरा त हाल खाइना कुतरा'
'पडतील स्वाती तर पिकतील मोती'
'पडल्या मघा नाही तर वरती बघा'
पडल हाती त करील अन्नाची माती'
'झाड तठ वारा...बरसती पाण्याच्या धारा'
'तण....खाई धन'
'जळो...पण पिको' (जमीन जाळण्याच्या प्रथेवरून) राब
'पोट हाय संग त काय पडल मागं'
विश्व वनवासींचे

२८